लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: तीन हात नाका उड्डाणपुलावर नाशिकच्या दिशेने जाणाºया मार्गावर उभ्या असलेल्या टेम्पोला मागून येणाºया दूधाच्या टेम्पोने जोरदार धडक दिल्याची घटना शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये टेम्पो चालक बाबासाहेब शंकर शेमडे (३०) यांच्या डोक्याला आणि पायाला मार लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना जवळच्याच एका खासगीरु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उभ्या असलेल्या टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.ठाण्यातील तीनहात नाका उड्डाणपूलावर नाशिकच्या दिशेने जाणाºया मार्गावर भल्या पहाटे एक टेम्पो बंद पडल्यामुळे तो रस्त्याच्या मधोमध उभा होता. या टेम्पो चालकाने कोणतेही इंडिकेटर किंवा रस्त्यात बॅरिकेटस लावलेले नव्हते. त्यामुळे शुक्र वारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास मागून आलेल्या दूधाच्या टेम्पोने उभ्या असलेल्या टेम्पोला जोरदार धडक दिली. यामध्ये दूधाच्या टेम्पोचे चालक शेमडे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनास्थळी नौपाडा पोलीस आणि ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने मदतकार्य राबविले. रस्त्यावरील अपघातग्रस्त दोन्ही टेम्पो बाजूला हटविल्याची माहिती सूत्रांनी दिली. हलगर्जीपणे रस्त्यावर टेम्पो उभा करुन अपघातास कारणीभूत ठरलेल्या राजेंद्र सोनवणे या टेम्पो चालकाला ताब्यात घेतले असून त्याची जामीनावर सुटका झाल्याचे पोलीस उपनिरीक्षक मोहिनी कपिले यांनी सांगितले.