भिवंडी : महाराष्ट्रातील मुस्लिमबहुल शहरात एमएमआय निवडणूक लढवून आपले स्थान निर्माण करीत आहे. या पक्षाने भिवंडी महापालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.महापालिका निवडणुकीकरिता रणनिती आखण्यासाठी मंगळवारी बैठक झाली. यासाठी तेलंगणातील एमआयएमचे आमदार आणि पक्षाचे निरीक्षक मोहज्जम खान आले होते. त्यांनी शहरातील कार्यकारिणी बरखास्त केल्याचे सांगत महापालिका निवडणुकीसाठी कोअर कमिटी बनविली आहे. काही दिवसांपूर्वी या पक्षाच्या अध्यक्षांनी व कार्यकर्त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केल्याने शहरातील एमआयएम पक्षाविषयी विविध अफवा पसरविल्या जात होत्या. याची दखल घेत खान यांनी शहरातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि पक्षाची पुनर्बांधणी करण्यास सुरुवात केली आहे.निवडणुका पुढे गेल्याने भिवंडीत एमआयएम पूर्ण ताकदनिशी निवडणुकीत उतरण्यास सज्ज झाली आहे, असे त्यांनी सांगितले. महापालिकेतील भ्रष्टाचार, टोरंटो पॉवर कंपनी, यंत्रमाग उद्योग व झोपडपट्टीत राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकाला त्रास भोगावा लागत आहे, असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेस यासिर अराफत, मुबीन भाई, गफ्फार भाई आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
निवडणुकीच्या रिंगणात एमआयएम उतरणार
By admin | Published: March 30, 2017 6:28 AM