ठाणे : जिल्ह्यातून विविध मार्ग आणि महामार्ग जातात, दळणवळण मोठ्या प्रमाणावर होते . साहजिकच राज्यात ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक अपघातांचे प्रमाण असून ते कमीतकमी कसे होईल, यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. विशेषत: दुचाकींचे वाढते अपघात कमी करण्यासाठी परिवहन विभागाने कसोशीने प्रयत्न करावेत, असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.नियोजन भवन सभागृहात येथील परिवहन विभागातर्फे राष्ट्रीय सुरक्षा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. एसटी बस चालकांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे. रस्त्यामध्ये मध्येच बस थांबवून प्रवाशाना उतरविणे धोक्याचे आहे. त्यामुळे तसे करू नये. महाविद्यालयीन तरूणही दुचाकी चालवितांना हेल्मेट न घालताना दिसतात, त्यमुळे ते स्वत:लाआणि कुटुंबाना देखील संकटात टाकतात. त्यामुळे आम्ही शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी हेल्मेट आवश्यक केले आहे. वाहनचालकांनी हे लक्षात घ्यावे की त्यांना मिळालेला परवना म्हणजे गाडी चालविण्याचा हक्क नाही तर केवळ सुविधा आहे. रस्त्याचा उपयोग करण्याचा पादचारी व इतर लोकांचा हक्क तितकाच महत्वाचा आहे, असे त्यांनी सांगितले.रस्ते आणि वाहने सुरक्षित करणे , हे आव्हान आम्हाला पार पाडावे लागते. अगदी मुक्या जनावरांचे बळी सुद्धा गेले नाही पाहिजेत. वाहने चालवितांना आपण ते व्यवस्थित चालवीत असलो तरी इतर वाहनचालक तसे चालवीत असतीलच असे नाही, त्यमुळे आपण नेहमी काळजी घेऊन वाहन चालवावे, असे मार्गदर्शन प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी उपस्थित चालकाना दिले. याप्रसंगी एस टी महामंडळाचे विभागीय नियंत्रक शैलेश चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी मार्गदर्शन केले. डॉ. पवार म्हणाले की, त्यांनी जास्तीत जास्त वेळा अपघातात मरण पावलेल्या तरूणांचे शव विच्छेदन केले आहे, त्यांच्या परिवारांचा आक्र ोश आपण पाहिला आहे. अपघातस्थळी १०८ रु ग्णवाहिका तातडीने अपघातग्रासताना मदत देण्यात नेहमीच आघाडीवर असतात असेही त्यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दिलीप दळवी, रोड सेफ्टी एनजीओचे विलास पवार यांनी देखील आपले विचार मांडले.* ट्रेफिक कीर्तन -यावेळी अभिनय कट्यायाचे किरण नाकती व त्यांच्या कलाकारांनी ट्रेफिक कीर्तन सादर करून वाहतूक नियमांची रंजकपद्धतीने माहिती दिली. याप्रसंगी वाहतूक नियमांची माहिती देणारी स्टीकर्स, पुस्तिका, पताका यांचे अनावरण करण्यात आले.
ठाणे जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमीतकमी करा - जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 7:20 PM
नियोजन भवन सभागृहात येथील परिवहन विभागातर्फे राष्ट्रीय सुरक्षा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. एसटी बस चालकांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे. रस्त्यामध्ये मध्येच बस थांबवून प्रवाशाना उतरविणे धोक्याचे आहे. त्यामुळे तसे करू नये. महाविद्यालयीन तरूणही दुचाकी चालवितांना हेल्मेट न घालताना दिसतात, त्यमुळे ते स्वत:लाआणि कुटुंबाना देखील संकटात टाकतात
ठळक मुद्देजिल्ह्यातून विविध मार्ग आणि महामार्ग जातात,साहजिकच राज्यात ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक अपघातांचे प्रमाणपरवना म्हणजे गाडी चालविण्याचा हक्क नाही तर केवळ सुविधा आहे