ठाणे : महाडमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मदत कार्य वेगाने व्हावे यासाठी राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले असून त्यांच्या सोबत ठाणे महानगर पालिकेची टीडीआरएफचे पथक आणि अग्नीशमन दलाचे पथक घटनास्थळी मदतीसाठी सकाळीच महाडमध्ये दाखल झाली आहेत.
महाड इमारत दुर्घटना घडल्यानंतर पालकमंत्री शिंदे रात्रीच महाडला रवाना झाले होते. त्याचवेळी त्यांनी महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांना ठाणे महानगरपालिकेची टीडीआरएफ आणि अग्नीशमन दलाची दोन पथके घटनास्थळी मदतकार्यासाठी पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्यासोबतच टीडीआरफ आणि अग्नीशमन दलाची ही दोन पथके रवाना झाली.
दोन्ही पथके सकाळी ७ वाजता दाखल होवून त्यांनी मदत कार्य सुरू केले आहे. एनडीआरएफ च्या जवानांसोबत टिडीआरएफ च्या पथकाने इमारतीचा ढिगारा उपसून त्यातील आडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्यास सुरवात केली आहे. या इमारत दुर्घटना ग्रस्त रहिवाश्यां च्या सर्व प्रकारच्या मदत कार्यासह मारतीचा ढिगारा उपसण्याचे काम, तेथील सर्व प्रकारच्या सहकार्यासाठी लक्ष केंद्रीत करुन शिंदे स्वत: महाडमध्ये तळ ठोकून आहेत. मदतकार्यास सुरूवात करण्यात आली आहे.