ठाणे: ठाणे कळवा- मुंब्रा भागातील पाण्याच्या गैरसोयीबद्दल जर ठाणे महापालिकेने दुर्लक्ष केले तर आम्हाला पालिका प्रशासनाकडे पहावे लागेल, असा इशाराच राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी दिला आहे. कळवा- मुंब्रा-कौसा भागात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. याच पाश्र्वभूमीवर डॉ. आव्हाड यांनी हा इशारा दिला आहे.
कळवा- मुंब्रावासियांच्या पाणी प्रश्नावर आक्र मक होण्याचा इशारा त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. यावेळी त्यांच्यासोबत शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि युवाध्यक्ष विक्र म खामकर हेही उपस्थित होते. डॉ. आव्हाड पुढे म्हणाले की, पाच दिवसांपासून कळवा- मुंब्रा भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. ठाणेकरांना पाण्याचा पुरवठा करणो ही ठाणे महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. पाच पाच दिवस पाणी न देणे हे योग्य नाही. पालिकेच्या स्थापनेपासून कळवा- मुंब्रा ठाण्यातच आहे. असे असताना या भागाला पाणी न मिळणे सहन करणार नाही. आमच्या पाण्याच्या गैरसोयीकडे दुर्लक्ष केले तर आम्हाला तुमच्याकडे लक्ष द्यावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.