शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा; "शरद पवार मुख्यमंत्री असताना दुबई एअरपोर्टवर.."
2
ठाकरेसेनेची सत्तारांविरोधात मोठी प्लॅनिंग; थेट भाजपा नेत्याला पक्षात घेणार,२०० गाड्या मुंबईकडे
3
“शरद पवार ४ वेळा CM, केंद्रात-राज्यात एकच सत्ता, तरी राज्याचा विकास केला नाही”: उदयनराजे
4
आप नेते सत्येंद्र जैन यांना अखेर जामीन मंजूर; तब्बल 18 महिन्यानंतर तुरुंगातून बाहेर
5
भाजपला नवी मुंबईतही धक्का बसण्याची शक्यता; गणेश नाईक पक्ष सोडण्याच्या विचारात? 
6
Kareena Kapoor : सैफ नव्हे 'या' अभिनेत्यासाठी वेडी झाली होती करीना कपूर; बाथरूममध्ये लावलेले पोस्टर
7
“अजितदादांच्या त्रासाला कंटाळून भाजपा सोडतो, शरद पवार गटात जाणार”; कुणी केली घोषणा?
8
जालियनवाला बाग हत्याकांडानंतर काय घडलं? अक्षय कुमार-माधवनचा आगामी सिनेमा 'या' घटनेवर आधारीत
9
'वाळवा विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक'; सदाभाऊ खोतांनी उमेदवारीची केली मागणी
10
"यूपी से है, मराठी नहीं आती..."; मुंबई मेट्रोमध्ये परप्रांतीय कर्मचारी भरतीवरून वाद
11
सद्गुरुंच्या ईशा फाउंडेशनविरोधातील खटला बंद, सर्वोच्च न्यायालयाने दिली महत्त्वाची माहिती
12
आमच्या मतदारांची नावे यादीतून वगळण्याचं भाजपा-शिंदे सेनेचं षडयंत्र; मविआचा आरोप
13
"उद्धव ठाकरेंना 'मविआ'समोर कटोरा घेऊन फिरावं लागतंय", चंद्रशेखर बावनकुळेंची बोचरी टीका
14
जनरल तिकीट काढल्यानंतर तुम्हाला किती तासांनी ट्रेन पकडावी लागेल? जाणून घ्या, नियम...
15
अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी मर्डर मिस्ट्री, कसा आहे अमेय वाघ-अमृता खानविलकरचा 'लाईक आणि सबस्क्राईब'?
16
९ वेळा MA, २ वेळा PhD... आता आठव्यांदा UGC NET; परीक्षा क्रॅक करण्याचा अनोखा रेकॉर्ड
17
झारखंडचं जागावाटप ठरलं, महाराष्ट्राचं कधी?; NDA मध्ये भाजपा लढणार सर्वाधिक जागा
18
रात्रीस खेळ चाले! अंतरवाली सराटीत फेऱ्या वाढल्या; रात्री १ वाजता जरांगेंना भाजपा नेते भेटले
19
Diwali 2024: दिवाळीत 'या' वस्तूंची चुकूनही करू नका खरेदी; लक्ष्मी ऐवजी अलक्ष्मी येईल घरी!
20
“४ नोव्हेंबरला मोठा स्फोट होणार, मविआ-महायुतीचे एन्काउंटर करणार”; परिवर्तन महाशक्तीचा दावा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग: आराेपीवर कडक कारवाईसाठी मनसेचा ठाण्यात माेर्चा

By जितेंद्र कालेकर | Published: October 17, 2024 9:17 PM

अन्यथा ठाणे बंदचाही इशारा: राज ठाकरेंचीही पीडित कुटुंबीय घेणार भेट

जितेंद्र कालेकर (ठाणे), लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे: भंडार आळीत एका ११ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या शिंदे सेनेचा उपविभागप्रमुख सचिन यादव याच्यावर कडक कारवाईसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह ठाणेकरांनी गुरुवारी माेर्चा काढला हाेता. हा माेर्चा ठाणे स्टेशन भंडार आळी ते मासुंदा तलावाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयापर्यंत काढण्यात आला हाेता. त्याच्याविरुद्ध मंगळवारपर्यंत अतिरिक्त कलमे लावून कारवाई झाली नाहीतर प्रसंगी ठाणे बंदची हाक दिली जाईल, असा इशाराही मनसेने यावेळी दिला.

गुरुवारी सायंकाळी ६.३० ते ७.३० वाजेदरम्यान काढलेल्या या माेर्चामध्ये मनसेचे ठाणे, पालघर अध्यक्ष अविनाश जाधव, ठाणे शहर अध्यक्ष रवी माेरे, महिला शहर अध्यक्षा समीक्षा मार्कंडे आणि उपाध्यक्षा मंजूळा डाकी यांच्यासह अनेक मनसे कार्यकर्ते सहभागी झाले हाेते. अत्याचार करणाऱ्या आराेपीचा जामीन रद्द झालाच पाहिजे, आराेपीला कडक शिक्षा झालीच पाहिजे अशा घाेषणा यावेळी देण्यात आल्या. गेल्या आठवडयात भंडारआळी भागातील अल्पवयीन मुलीचा यादव याने विनयभंग केला हाेता. या घटनेनंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाणेनगर पाेलिसांनी त्याला अटकही केली. परंतू, दुसऱ्याच दिवशी ताे जामीनावर सुटल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. त्याच्यावर आणखी कठोर कलमे लावून पुन्हा अटक करावी, त्याचा जामीन रद्द करावा अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांसह स्थानिक नागरिकांनी केली. त्याच्याविरुद्ध मंगळवारपर्यंत अतिरिक्त कलमे लावून कारवाई झाली नाहीतर प्रसंगी ठाणे बंदची हाक दिली जाईल, असा इशाराही मनसेने यावेळी दिला.

या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप हाेत असल्याचा आरोप केला जात आहे. राज ठाकरेंची पिडित कुटुंबीय भेट घेणार-शुक्रवारी ठाण्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे येणार आहेत. त्यावेळी पीडित कुटुंबीय राज यांची भेट घेउन कैफियत मांडणार असल्याची माहिती मनसेचे रवी माेरे यांनी दिली.

टॅग्स :MNSमनसे