मीरारोड - मीरारोड भागात राहणाऱ्या एका इसमाने पत्नी काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन तिला धमकावत बाहेर बोलावले . नंतर तिला गाडीत बसवून घटस्फोट घ्यायचा असल्याचे लिहून दे सांगितले . तिने नकार दिला असता घरी आणून पत्नी व सासऱ्यास शिवीगाळ , मारहाण केली . अल्पवयीन मेव्हणी घरी आली असता तू समलैंगिक आहेस असे सांगून तिच्याशी शारीरिक लगट करत तिचा टीशर्ट फाडला . नवघर पोलिसांनी महिलेच्या फिर्यादी वरून पत्नी व सासऱ्यास शिवीगाळ, मारहाण केली आणि अल्पवयीन मेव्हणीचा विनयभंग केल्या प्रकरणी पती वर गुन्हा दाखल केला आहे . आरोपी पतीला पोलिसांनी गुरुवारी पहाटे अटक केली आहे . उपनिरीक्षक सचिन उबाळे हे तपास करत आहेत .
पत्नी व सासऱ्यास मारहाण करून अल्पवयीन मेव्हणीचा विनयभंग
By धीरज परब | Published: October 19, 2023 6:22 PM