मीरारोड : मीरा-भाईंदर महापालिकेच्या घोडबंदर येथील पालिका शाळेत गेल्या पाच वर्षां पासून मुख्याध्यापकच नसल्याने मनविसेच्या शिष्ट मंडळाने शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी यांना घेराव घातला . मुख्याध्यापक नेमला नाही तर आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला.
महापालिकेची घोडबंदर गावातील शाळा ही जुनी असून १ ली ते ७ वी पर्यंतचे वर्ग आहेत . घोडबंदरच्या या पालिका शाळा क्र ९ मध्ये २०१३ पासून मुख्याध्यापकच नाही. आधीचे मुख्याध्याप यांची मार्च २०१३ मध्ये झाल्यावर दुसरा मुख्याध्यापकच नेमण्यात आला नाही . तर अनेक वर्ष शिक्षिका असलेल्या रजनी चव्हाण ह्या शाळेलच्या मुख्याध्यापकाचा कारभार सांभाळत आहेत . चव्हाण या अनुभवी असल्या तरी मुख्याध्यापकाचे त्यांना अधिकार नसल्याने अनेकवेळा अडचण होत असते .
सतत पाच वर्षे विना मुख्याध्यापकाची शाळा चालत असल्याने पालिकेमार्फत मिळणाऱ्या काही सुविधांपासून वंचित राहिल्याचे सांगत मनविसेने शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी सुरेश देशमुख यांना घेराव घातला. शाळेला लवकरात लवकर मुख्याध्यापक बसवून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार पालिकेला दिलेला नाही. असे प्रकार घडलेच तर मनविसे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उग्र आंदोलन छेडेल असा इशारा दिला . येणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०१८ पासून सदर शाळेला मुख्याध्यापक देणार आहोत असे आश्वासन देशमुख यांनी दिले.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे मीरा भाईंदर शहर सचिव शान पवार, गणेश बामणे, शेरा पुरोहित, प्रवीण पाटील, ऋषीकेश नलावडे, महेश चव्हाण, विजय राठोड, अक्षय पारकर, विशाल कदम, दादा कदम व इतर मनविसे कार्यकर्ते उपस्थित होते.