भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने २०१७-१८ या आर्थिक वर्षात करवसुलीसाठी सुमारे २७१ कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. तरी, कर विभागाने एप्रिलपासून आजपर्यंत अवघी ३३ टक्केच करवसुली झाल्याचे समोर आले आहे. यामुळे आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी उर्वरित ६७ टकके करवसुलीसाठी लवकरच तीव्र मोहीम सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.शहरातील एकूण मालमत्तांपैकी पालिकेत केवळ ३ लाख २८ हजार ८७८ मालमत्तांची नोंद आहे. यात २ लाख ७३ हजार ८०७ निवासी, तर ५५ हजार ७१ व्यावसायिक मालमत्तांचा समावेश आहे. यातून मिळणाºया करापोटी पालिकेने यंदाच्या अंदाजपत्रकात एकूण २७१ कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. परंतु, यात वादग्रस्त, पूर्वीच्या इमारती धोकादायक ठरल्याने त्या तोडण्यात आल्यानंतरही त्यातील रहिवाशांचा मालमत्ता कर जैसे थे आहे. पूर्वीच्या मालमत्ता सध्या अस्तित्वात नसल्या, तरी त्यापोटी थकीत असलेला तब्बल ८६ कोटींचा कर न होणारी वसुली म्हणून समाविष्ट करण्यात आला आहे.प्रत्यक्षात मात्र १८५ कोटी करवसुलीचे उद्दिष्ट प्रशासनासमोर आहे. यापैकी गेल्या सात महिन्यांत कर विभागाने ६१ कोटी ८९ लाखांची म्हणजेच ३३ टकक्यांचीच वसुली केल्याचे निदर्शनास आले आहे. गतवर्षीदेखील कर विभागाने करवसुलीच्या उद्दिष्टाला हरताळ फासून सुमारे ३० ते ३५ टक्के करवसुली केली होती.
मीरा-भार्इंदर महापालिका: सात महिन्यांत अवघी ३३ टक्के करवसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 1:27 AM