शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
4
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
5
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
6
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
7
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
8
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
10
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
11
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
13
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
15
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
16
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
18
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
20
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

मीरा-भार्इंदर महापालिकेने गेल्या सहा वर्षांत ९ हजारांहून अधिक केली वृक्षतोड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2017 6:28 PM

मीरा-भार्इंदर महापालिकेने गेल्या सहा वर्षांत सार्वजनिक विकासाआड येणारी व खासगी विकासाला बाधा ठरणारी सुमारे ९ हजार ३०० हून अधिक झाडे तोडली.

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने गेल्या सहा वर्षांत सार्वजनिक विकासाआड येणारी व खासगी विकासाला बाधा ठरणारी सुमारे ९ हजार ३०० हून अधिक झाडे तोडली. या बदल्यात पालिकेने विविध प्रकारची सुमारे ४ हजार ११८ झाडांचीच लागवड केल्याचे आरटीआय कार्यकर्ता कृष्णा गुप्ता यांनी माहिती अधिकारातून उजेडात आणले आहे. मात्र यात राज्य सरकारच्या वनमहोत्सव दरम्यान पालिकेने नेमकी किती झाडे लावली, ते मात्र प्रशासनाकडून गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.पालिकेकडून रस्ता रुंदीकरणासह विविध विकासाआड येणारी झाडे तोडल्याचे अनेकदा समोर आले आहे. तर खासगी विकासात बाधा ठरणारी झाडे देखील पालिकेच्या दुर्लक्षामुळे बिनदिक्कत तोडण्यात आली आहेत. हा बेकायदेशीर प्रकार अनेकदा समोर आला असला तरी ती झाडे तोडणा-यांवर अद्याप गुन्हे नोंदविण्यात आलेले नाहीत. तीन वर्षांपूर्वी पालिकेने बाधित वृक्षाला समूळ बाहेर काढून त्याचे इतरत्र पुनर्रोपण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कार्यवाहीला देखील सुरुवात झाली होती. क्रेनच्या सहाय्याने झाडे समूळ उखडून त्यांचे इतरत्र केले जाणारे पुनर्रोपण पालिकेला पुढे खर्चिक ठरू लागल्याने पुन्हा ती तोडण्यास सुरुवात झाली. जेवढी झाडे तोडण्यात येतील, त्याच्या पाचपट झाडे लावण्याचा निर्णय प्रशासनाकडुन घेण्यात आला. परंतु गेल्या सहा वर्षांत तोडण्यात आलेल्या सुमारे ९ हजार ३६८ झाडांपैकी आतापर्यंत सुमारे ४ हजार ११८ झाडे नव्याने लावण्यात आल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. आरटीआय कार्यकर्ता कृष्णा यांनी वृक्षतोडीची माहिती पालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाकडे मागितली होती. त्यावर प्राप्त माहितीत तोडण्यात आलेल्या झाडांची संख्या २०११-१२ मध्ये ४११०, २०१२-१३ मध्ये १४३६, २०१३-१४ मध्ये ८९८, २०१४-१५ मध्ये सुमारे १ हजार, २०१५-१६ मध्ये सुमारे ११४६ व २०१६-१७ मध्ये सुमारे ७७८ इतकी नमुद करण्यात आली आहे. यातील २०११-१२ मध्ये उत्तन घनकचरा प्रकल्पातील तब्बल २ हजार झाडे तोडण्यात आली. या बदल्यात लावण्यात आलेली झाडांची संख्या सुमारे ४ हजार ११८ इतकीच असल्याचे समोर आले आहे. यात २०१४-१५ मध्ये लागवड केलेल्या बॉटलपाम झाडांची संख्या ४५२, पेल्ट्रोफारमची १५ झाडे, गुलमोहची १८, समुद्रफळाची २७९, नारळाची २१४, बदामाची ११५ व इतर २१ अशा १ हजार ११४ झाडांचा समावेश आहे.पालिकेने २०११-१२ पासुन तोडलेल्या झाडांच्या मोबदल्यात लावण्यात आलेल्या झाडांचा तपशील थेट त्याच वर्षापासुन न देता तो २०१४-१५ पासुन दिला आहे. २०१५-१६ मध्ये १ हजार १४८ झाडे, २०१६-१७ मध्ये सुमारे १ हजार ८५६ अशा एकूण ४११८ झाडांची लागवड केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यात राज्य सरकारने गेल्या तीन दोन वर्षांत सुरू केलेल्या वनमहोत्सव अंतर्गत लागवड केलेल्या झाडांचा तपशील मात्र देण्यात आलेला नाही. दिलेल्या माहितीवरून पालिकेची वृक्षतोड मात्र जोरात तर वृक्षलागवड बेताची असल्याचे स्पष्ट झाले असून, प्रशासनाला पर्यावरणाशी कोणतेही देणेघेणे नसल्याचेही जाणवू लागल्याचा आरोप कृष्णा यांनी केला आहे.