शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

मीरा-भार्इंदर महापालिकेकडून यंदा कंत्राटी सफाई कामगारांना विनाविलंब बोनस अदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 7:45 PM

मीरा-भार्इंदर महापालिकेने यंदा १० दिवसांपुर्वी कंत्राटी कामगारांना एक महिन्याच्या पगाराप्रमाणेच दिवाळी बोनस द्यावा, अशी मागणी श्रमजीवी कामगार संघटनेने पत्राद्वारे पालिकेकडे गेल्या महिन्यात केली होती. या एकाच पत्राची दखल घेत प्रशासनाने बोनस देण्यास विलंब न लावता त्यांना १५ दिवसाआधीच बोनस अदा केल्याने कामगारांकडून आनंद व्यक्त

 - राजू काळे  

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने यंदा १० दिवसांपुर्वी कंत्राटी कामगारांना एक महिन्याच्या पगाराप्रमाणेच दिवाळी बोनस द्यावा, अशी मागणी श्रमजीवी कामगार संघटनेने पत्राद्वारे पालिकेकडे गेल्या महिन्यात केली होती. या एकाच पत्राची दखल घेत प्रशासनाने बोनस देण्यास विलंब न लावता त्यांना १५ दिवसाआधीच बोनस अदा केल्याने कामगारांकडून आनंद व्यक्त होत असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.

पालिकेत सुमारे २ हजार ३०० कंत्राटी सफाई कामगार कार्यरत असून या कामगारांना किमान वेतन प्राप्त करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडीत यांच्या नेतृत्वाखाली अनेकदा कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले. तब्बल ३ वर्षांच्या लढ्यानंतर कामगारांना किमान वेतनाचा लाभ देण्यात आला. तसेच गतवेळच्या दिवाळीचा बोनसही दिवाळीपुर्वी किमान १० दिवस आधी देण्याची मागणी संघटनेने प्रशासनाकडे करण्यात आली होती. परंतु, कामगारांना सततच्या मागणीनंतरही प्रशासनाने त्यांना ऐन दिवाळीतच बोनस अदा केला होता. यंदा मात्र प्रशासनाने १५ दिवसाआधीच अपेक्षित बोनस देऊन कामगारांना सुखद धक्का दिल्याचे सांगण्यात येत आहे. तत्पुर्वी यंदाच्या दिवाळीचा बोनसही १० दिवस आधी देण्याची मागणी संघटनेने गेल्याच महिन्यात प्रशासनाकडे पत्राद्वारे केली होती. तसेच यंदाचा बोनस २६ दिवसांच्या पगाराप्रमाणेच अदा करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांच्यासोबत संघटनेच्या पदाधिकाय््राांनी चर्चा देखील केली होती. त्यावेळी उपायुक्तांनी बोनस लवकरात लवकर देण्याचे आश्वासन दिले होते. दिलेल्या आश्वासनावर आडेवेडे न घेता पालिकेने त्यांना दिवाळीच्या १५ दिवसाआधीच बोनस अदा केला. तसेच २६ दिवसाच्या पगाराप्रमाणे केलेली बोनसची मागणी देखील प्रशासनाने मान्य केल्याने कामगारांची यंदाची दिवाळी आनंदी ठरल्याची माहिती संघटनेचे तालुका अध्यक्ष दिलिप गोतारणे यांनी दिली. पालिकेने केवळ कंत्राटी सफाई कामगारांना बोनस दिला असला तरी त्यातील उद्यान विभागाचे सुमारे २९० कंत्राटी कामगार, भारतरत्न स्व. इंदिरा गांधी व पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयातील प्रत्येकी ३० कामगार, तेथीलच १५ सुरक्षा रक्षक आणि १०० लिंकवर्कर्सना प्रशासनाने अद्याप बोनसपासुन वंचित ठेवले आहे. त्यांनाही लवकरात लवकर बोनस देण्याचे प्रयत्न प्रशासनाकडुन सुरु असल्याचे उपायुक्त डॉ. पानपट्टे यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणे