- राजू काळे
भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांचा कारभार आक्षेपार्ह असल्याची तक्रार स्थानिक भाजपा आ. नरेंद्र मेहता यांनी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. त्याची दखल घेत येत्या महिनाभरात आयुक्तांची उचलबांगडी होण्याची शक्यता सुत्रांकडुन वर्तविली जात आहे.
आयुक्तांनी अद्याप कराची वसुली प्रभावीपणे केलेली नाही. गतवर्षीची वसुली व यंदाची वसुली यात मोठी तफावत असुन यंदा कर वसुलीपेक्षा इतर कामांत आयुक्त व्यस्त असल्याचा आरोप सत्ताधाय््राांकडुन केला जात आहे. त्यांनी बार व लॉजिंग-बोर्डींगवर केलेली तोडक कारवाई ठोसपणे केलेली नाही. त्यामुळे तोडण्यात आलेले बार व लॉजिंग-बोर्डींग पुन्हा जोमाने सुरु झाल्याचा दावा करण्यात येत आहे. आयुक्तांनी आपल्या कार्यकाळात एकही नवीन विकास काम केलेले नाही. त्यांच्याकडुन ज्या विकासाच्या गप्पा ठोकल्या जात आहेत. त्या तत्कालिन आयुक्तांच्या कार्यकाळात झालेल्या असल्याचा दावा केला जात आहे. एकीकडे बांधकाम परवानग्या देताना त्यातील सर्व त्रुटी दुर करण्याच्या सुचना अधिकाय््राांना दिल्या जातात. तर दुसरीकडे आयुक्त नगरविकास विभागातच ठाण मांडून बांधकाम परवानग्या देत असल्याचा आरोप केला जात आहे. आठवड्यातून अनेकदा ते आपल्या दालनात अनुपस्थित राहतात. त्यांनी त्याची कल्पना महापौरांना देणे अपेक्षित असतानाही ते त्याला छेद देत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सत्ताधाय््राांच्या विकासाच्या मुद्यावर ते अनेकदा असहमती दर्शवित असल्यानेच त्यांच्या एकतर्फी कारभारात पदसिद्ध अधिकाय््राांच्या उपस्थितीची आवश्यकताच नसल्याने दालनांना टाळे ठोकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सत्ताधाय््राांकडुन सांगण्यात आले. त्याची कल्पना थेट मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी सत्ताधाय््राांनी प्रयत्न केला असता ते बाहेरगावी गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातुन मुख्यमंत्र्यांना संपर्क साधुन त्यांना आयुक्तांच्या एकतर्फी कारभाराची माहिती देण्यात आली. त्यावर मुख्यमंत्री परतल्यानंतरच निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी येत्या महिनाभरात आयुक्तांची उचलबांगडी होणार असल्याचे सुत्राकडुन सांगण्यात येत आहे.
आयुक्तांसोबत आमचे कोणतेही वैयक्तिक मतभेद नाहीत. आम्ही विकासाच्या मुद्यावर भांडत आहोत. पण ते आम्हाला सहकार्य करीत नाहीत. त्यांचा कारभार संथगतीने सुरु असुन त्यात पालिकेचे नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठीच आम्ही दालनांना कुलूप ठोकले आहे. आयुक्तांना कारभार सुधारण्यासाठी आठवड्याची मुदत दिली आहे. त्यात सुधारणा न झाल्यास पुढील निर्णय घेऊ. - आ. नरेंद्र मेहता
प्रशासन विकासाच्या मुद्यावर काम करीत आहे व करीत राहणार. यात कोणतेही दुमत नाही. प्रत्येक लोकप्रतिनिधींचा सन्मान करणे प्रशासकीय अधिकाय््राांचे कर्तव्य आहे, तशा सुचना देखील देण्यात आल्या आहेत. मात्र त्यात काही त्रुटी असतील तर चर्चेद्वारे त्या दुर करण्यात येतील. त्यामुळे त्यात कोणताही गैरसमज होऊ नये. - आयुक्त डॉ. नरेश गीते