शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
4
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
5
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
6
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
7
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
9
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
10
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
11
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
12
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
13
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
14
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
15
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
16
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
17
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
18
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
19
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
20
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."

उद्योजक संघटना म्हणते, "क्लस्टर काय माहिती नाही ? त्यापेक्षा आम्हाला सोयी - सुविधा द्या" 

By धीरज परब | Published: July 05, 2023 5:10 PM

औद्योगिक वसाहती क्लस्टर योजनेत आणणे अडचणीचे? 

लोकमत न्यूज नेटवर्क,  मीरारोड - मीरा भाईंदर मधील स्टेनलेस स्टील उद्योगसह शहरात अन्य विविध स्वरूपाच्या लहान उद्योगांची संख्या सुमारे ८ ते १० हजाराच्या घरात असून ह्या औद्योगिक गाळ्यांच्या वसाहती क्लस्टर खाली विकसित करण्याची चर्चा प्रशासकीय आणि राजकीय स्तरावर सुरु झाली आहे . तर क्लस्टरची आमची मागणीच नसून ग्रामपंचायत काळा पासूनचा औद्योगिक गाळ्यांना सोयी - सुविधा द्या आणि असलेल्या समस्या सोडवा असे औद्योगिक संघटनां कडून सांगण्यात आले आहे . तर औद्योगिक वसाहतीत क्लस्टरचा प्रस्ताव शासन स्तरावरून मंजूर करून आणण्याचे दिव्य महापालिकेस पार पाडावे लागणार आहे . 

मुंबईला लागून असल्याने मीरा भाईंदर हे ग्रामपंचायत काळी औद्योगिक हब म्हणून ओळखले जात होते . परंतु मुंबईतील जमिनीच्या किमती वाढू लागल्या आणि मीरा भाईंदर मध्ये बिल्डर लॉबी , राजकारणी आदींनी जमिनी खरेदी करून इमारती उभारण्यास सुरवात केली . गेल्या काही वर्षात तर राजकारणी - बिल्डर व पालिका प्रशासनास ह्या औद्योगिक वसाहती अडचणीच्या ठरू लागल्या आहेत . अनेक मोठ्या कंपन्यांच्या जागी उत्तुंग निवासी इमारती उभ्या राहिल्या आहेत .  त्यातच नव्याने झालेल्या इमारतीं मधील रहिवाश्याना ग्रामपंचायत काळा पासूनचे उद्योग हे त्रासदायक वाटू लागले आहेत . 

राजकारणी आणि प्रशासनाने देखील शहरातील औद्योगिक वसाहतींच्या विकासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले . रस्ते , गटार , पाणी आदी सारख्या मूलभूत सुविधा देखील ह्या औद्योगिक क्षेत्रात दिल्या नाहीत . सखल भाग झाल्याने पावसाळ्यात पाणी तुंबून मोठे नुकसान होते .  जुने गाळे जीर्ण व धोकादायक झाले असताना त्यांना दुरुस्ती व नवीन बांधकामास देखील आडमुठेपणा केल्याने या आद्योगिक वसाहतीं मध्ये अनेक अनधिकृत बांधकामे निर्माण झाली आहे .  श्री भाईंदर स्टेनलेस स्टील मॅन्युफेक्चर अँड ट्रेडर्स असोसिएशन , मीरा भाईंदर स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आदी संघटनांनी महापालिका , राजकारणी आदीं कडे सातत्याने त्यांच्या समस्या आणि हव्या असलेल्या सुविधांची मागणी चालवली आहे . मात्र आता पर्यंत त्याकडे कानाडोळा केला गेलाय . त्यामुळे अनेक उद्योग हे शहर सोडून गुजरात - राजस्थान आदी राज्यात जात आहेत . 

स्टील संघटनेचे सुमारे अडीज हजार गाळेधारक सदस्य आहेत तर स्मॉल स्केल चे सुमारे एक हजाराच्या घरात सदस्य असल्याचे सांगितले जाते . नुकतेच मीरारोड येथे भरवण्यात आलेल्या स्टील प्रदर्शनात आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन , आयुक्त दिलीप ढोले आदींनी भेट दिली त्यावेळी देखील उद्योजकांनी त्यांची गाऱ्हाणी मांडली होती . 

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मीरारोड मध्ये कार्यक्रमासाठी आले असता आ. गीता जैन यांनी उद्योजकांचा विचार करण्याचा मुद्दा मांडला तर आयुक्त ढोले यांनी क्लस्टर चा प्रस्ताव सुचवला होता . तर औद्योगिक वसाहतीत क्लस्टर कसा राबवणार ?  निवासी इमारती सारख्या उंच इमारती बांधता येणार नाहीत . कारण उत्पादनासाठी अवजड व मोठी यंत्रे वापरात असतात . ती तळ मजल्यावरच राहू शकतात . औद्योगिक इमारत बांधायची तर ते प्रत्यक्षात सोयीचे ठरेल का ? असे प्रश्न गाळेधारक करू लागले आहेत . 

राजेंद्र मित्तल ( अध्यक्ष  - श्री भाईंदर स्टेनलेस स्टील मॅन्युफेक्चर अँड ट्रेडर्स असोसिएशन ) - क्लस्टर काय हेच आम्हाला माहिती नाही ? झोपडपट्टी वा अनधिकृत बांधकामांना जसे शासन नियमित करते त्याच धर्तीवर ग्रामपंचायत काळातील औद्योगिक गाळ्यांना नियमित करा .  सोयी - सुविधा द्या . आम्ही पालिका व सरकारला नियमित कर भरतो , हजारो रोजगार उपलब्ध होऊन हजारो कुटुंब अवलंबून आहेत . उद्योग टिकले तर रोजगार , कर मिळेल व देशाची प्रगती होते . त्यामुळे हजारो लहान उद्योजकांकडे लक्ष दिले गेले पाहिजे .  

उमर कपूर ( अध्यक्ष - मीरा भाईंदर स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन ) - क्लस्टरची आमची मागणी नसुन क्लस्टर योजना औद्योगिक  वसाहतींच्या ठिकाणी कशी राबवता येईल याची माहिती अजून आम्हाला मिळालेली नाही . औद्योगिक वसाहतींना चांगले रस्ते , पाणी , गटार आदी सुविधा द्या . हुण्या गाळ्यांना दुरुस्ती व नवीन बांधकाम परवानगी द्या जेणे करून उद्योजकांना दिलासा मिळेल व उद्योग टिकून राहतील . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर