शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला; शरद पवारांचे स्पष्ट संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 1:46 AM

मेंडोन्सा, गीता जैन यांच्या राजकीय मनसुब्यांवर फिरले पाणी

मीरा रोड : मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने चांगला कार्यकर्ता उमेदवार म्हणून द्यावा. राष्ट्रवादी काँग्रेस त्याला पाठिंबा देईल, असे मत मीरा रोड येथील सोमवारच्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. यापूर्वी माजी मंत्री गणेश नाईक यांनी काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांचे नाव उमेदवारीकरिता पत्रकार परिषदेत घेतले होते. पवार यांनी त्यावर शिक्कामोर्तबच केले.राष्ट्रवादीच्या कोट्यातील जागा काँग्रेससाठी सोडतानाच येणारी विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याची सुरुवात मीरा-भार्इंदरमधून केल्याचे पवार म्हणाले. जागा सोडण्याची अशी जाहीर घोषणा पवारांनी केल्याने व्यासपीठावर बसलेले काँग्रे्रस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हेही आश्चर्यचकित झाले. पवारांच्या घोषणेमुळे राष्ट्रवादीची उमेदवारी मिळण्याकरिता प्रयत्न करणाऱ्यांचे मनसुबे संपुष्टात आले आहेत.मीरा-भार्इंदर हा मतदारसंघ २००९ साली अस्तित्वात आला, तेव्हा मुझफ्फर हुसेन यांनी दावा केला असता आघाडीत तो राष्ट्रवादीने खेचून घेतला होता. गिल्बर्ट मेंडोन्सा हे राष्ट्रवादीचे आमदार म्हणून निवडून आले होते. २०१४ मध्ये आघाडी नसल्याने आणि मोदीलाटेत मेंडोन्सांना पराभूत करून भाजपचे नरेंद्र मेहता आमदार झाले. मेंडोन्सा सेनेत गेले, पण युती झाल्याने मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाणार म्हणून मेंडोन्सा लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा राष्ट्रवादीत जातील आणि निवडणूक लढवतील, अशी चर्चा सुरू झाली होती. आ. मेहतांच्या विरोधक माजी महापौर गीता जैन यासुद्धा राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा होती.मेंडोन्साविरोधी गटसुद्धा उल्हसितकाँग्रेसमध्ये अस्वस्थता होती. हुसेन यांनी स्थानिक नेत्यांपासून थेट पवारांपर्यंत तसेच आपल्या पक्ष नेतृत्वाकडे काँग्रेसला मतदारसंघ सुटावा म्हणून प्रयत्न चालवले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी गेल्या महिन्यात आघाडीच्या पत्रकार परिषदेत काँग्रेसला विधानसभा मतदारसंघ सोडण्याचे संकेत दिले होते. पवार यांनी तर तशी घोषणाच सभेत केली. मीरा-भार्इंदरमधील परांजपे यांच्या प्रचाराची धुरा हुसेन यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीने दिली. पवारांच्या घोषणेमुळे मीरा-भार्इंदर काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीतील मेंडोन्साविरोधी गटसुद्धा उल्हसित झाला आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरcongressकाँग्रेसSharad Pawarशरद पवार