मीरारोड - सायबर लुटारूंनी ऑनलाईन फसवणूक केलेल्या दोघाजणांना फसगत झालेली १० लाख ५ हजार रुपयांची रक्कम मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलीस ठाण्याने परत मिळवून दिली.
विरार पोलीस ठाणे हद्दीत राहणारे झा यांना टेलिग्राम वर ऑनलाईन पार्ट टाइम जॉब ची जाहिरात दिसली होती . ऑनलाईन प्रॉपर्टीना रेटिंग दिल्यावर पैसे मिळणार असे आमिष दाखवले होते . त्याचे टास्क विकत घेण्यासाठी झा यांनी ५ लाख ७ हजार ६७६ रुपये भरले . परंतु झा यांना कामाचे पैसे तर सोडाच मन मूळ भरलेली मुद्दल देखील मिळाली नाही. त्यांनी या बाबत २०२३ साली सायबर शाखेत तक्रार केल्या नंतर विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तर अर्नाळा पोलीस ठाणे हद्दीत राहणारे सिन्हा यांना देखील अनोळखी सायबर लुटारूंनी गुंतवणूक योजना व विविध टास्क मध्ये पैसे भरण्यास सांगून फसवणूक केली होती . सिन्हा यांनी त्या बाबत मे २०२४ मध्ये सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
या दोन्ही सायबर फसवणुकी प्रकरणी पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर , सहायक निरीक्षक स्वप्नील वाव्हळ , उपनिरीक्षक प्रसाद शेनोलकर सह पल्लवी निकम , स्नेहल पुणे , शुभम कांबळे , प्रवीण सावंत करत व्यवहारांची माहिती घेऊन बँकेत रक्कम गोठवली . पोलिसांनी झा यांना ५ लाख ७ हजार ६७६ रुपये तर सिन्हा यांना ४ लाख ९७ हजार ५२३ रुपये इतकी फसवणुकीची रक्कम मूळ खात्यात परत मिळवून दिली .