शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

बजरंग दलाच्या शौर्य प्रशिक्षण शिबिराची मीरा रोड पोलिसांनी केली चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 4:22 AM

सर्व स्तरांतून टीका : उत्साही पदाधिकाऱ्याने टाकलेल्या फोटोंवरून वाद

मीरा रोड : मीरा रोड येथील सेव्हन स्क्वेअर शाळेमध्ये विश्व हिंदू परिषदेंतर्गत बजरंग दलाच्या शौर्य प्रशिक्षण शिबिरात आलेल्या सव्वाशे प्रशिक्षणार्थ्यांना बौद्धिक आणि शारीरिक प्रशिक्षण देताना एअरगनने नेमबाजी शिकवण्यात आली असल्याचे समोर आले आहे. बजरंग दलाच्या एका अतिउत्साही प्रचारकाने सदर शिबिराच्या फोटोंसोबत उत्तर प्रदेशच्या शिबिरातील फोटोही सोशल मीडियावर टाकल्याने वाद झाला. त्यातच सदर शाळा भाजप आमदार नरेंद्र मेहता व कुटुंबीयांची असल्याने अशा प्रकारच्या प्रशिक्षणावरून टीकेची झोड जास्तच कठोर झाली आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या अंतर्गत येणाºया बजरंग दलाच्या कोकण प्रांताचे शौर्य प्रशिक्षण वर्ग २०१९ चे आयोजन यंदा आ. मेहतांच्या शाळेत २५ मे ते १ जूनदरम्यान करण्यात आले होते. सदर शिबिरासाठी राज्याच्या कोकण प्रांत तसेच गोव्यामधून एकूण सव्वाशे प्रशिक्षणार्थी आले होते. ते सर्व १८ ते ३५ वर्षे वयोगटांतील होते.

या प्रशिक्षणादरम्यानचे काही फोटो प्रशांत गुप्ता या बजरंग दलाच्या विस्तारकाने सोशल मीडियावर टाकले. सेव्हन स्क्वेअर अ‍ॅकॅडमीमध्ये बजरंग दलाचे प्रशिक्षण असल्याचेदेखील त्यांनी नमूद केले होते. शाळेच्या वर्गात बंदुकीसोबत असणारे प्रशिक्षणार्थी व खाली ठेवलेल्या बंदुकीचे फोटो सेव्हन स्क्वेअर शाळेतील होते. पण, जाळपोळ व बंदुकीने फायरिंग करतानाचे टाकलेले फोटो मात्र सदर शाळेतील नव्हते.दरम्यान, सोशल मीडियावर टाकलेल्या सदर छायाचित्रांवरून खळबळ उडाली. मीरा रोडच्या आ. मेहतांच्या शाळेत गोळीबार करणे, जाळपोळ आदींचे प्रशिक्षण दिले जात असल्याच्या तक्रारी डीवायएफआय, अ‍ॅड. संजय पांडे, आम आदमीचे ब्रिजेश शर्मा आदींनी केल्या. याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच टीकेची झोड उठून पोलीस आदी यंत्रणांची धावपळ सुरू झाली.

नवघर पोलिसांनी याची माहिती घेऊन चौकशी सुरू केली. शाळेतील वर्गात व परिसरात असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासणीसाठी घेणार आहोत, असे निरीक्षक राम भालसिंग यांनी यासंदर्भात सांगितले. गुप्ताने टाकलेले फोटो सोशल मीडियावरून काढून टाकण्यात आले आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडेसुद्धा चौकशी केली आहे.

मीरा-भाईंदर बजरंग दलाचे संयोजक चंद्रकांत झा यांनी सांगितले की, एअरगनच्या साहाय्याने शिबिरात नेमबाजीसह ज्युदो-कराटे, मल्लखांब, जमिनीवर सरकणे आदी विविध प्रकारच्या शारीरिक व आत्मरक्षणाचे प्रशिक्षण दिले गेले. पण, जाळपोळ वा कोणत्याही खºया बंदुका नव्हत्या. याशिवाय गोरक्षा, धर्मांतरणविरोधी प्रकार रोखणे आदींवर चर्चासत्रे झाली. सोशल मीडियावर येथील शिबिराच्या छायाचित्रांसोबत दुसरीकडची छायाचित्रे टाकली गेली आणि कम्युनिस्ट विचारसरणींच्या काहींनी यातून चुकीच्या तक्रारी केल्याचे झा म्हणाले. एअरगन वापरल्या, यात काही चुकीचे नाही. सदर शाळा आ. मेहतांची असल्याने हा वाद जास्त वाढल्याचे ते म्हणाले.

तक्रारदारांनी मात्र भाजप आमदाराच्या शाळेत अशा प्रकारचे शस्त्रहाताळणीचे तसेच धर्मांध व द्वेषकारक प्रशिक्षण शिबिर कट्टरपंथींकडून चालवणे मीरा-भाईंदर शहरच नव्हे, तर देशाचे संविधान आणि समाजासाठी घातक असल्याचे सांगत कारवाईची मागणी केली आहे.मी भाजपचा आमदार आहे आणि बजरंग दलाचे शिबिर होते म्हणून चुकीच्या छायाचित्रांच्या आधारे चुकीचे वृत्त येत आहे. शाळा व मैदान आम्ही सुटीच्या दिवसांत भाड्याने देत असतो. त्यात गैर काय आहे? मी शिबिराची माहितीदेखील घेतली आहे.

जत्रेत फुगे फोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एअरगनचे प्रशिक्षण देण्यात आले. यात गैर काय आहे? यासंदर्भातील बातम्या खोट्या आहेत, हे पालक आणि विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने पत्रकाद्वारे सांगितले जाणार आहे. - आ. नरेंद्र मेहता, शाळा संचालक