शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

उल्हासनगरात भाजपच्या जल्लोषाला गालबोट, पोलिसांना धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 1:01 AM

मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांचा शपथविधी झाल्याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

उल्हासनगर - मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांचा शपथविधी झाल्याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. या जल्लोषाला गालबोट लागून पोलिसांना झालेल्या धक्काबक्कीप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरवाडकर यांनी दिली.उल्हासनगरातील गोलमैदान, शिवाजी चौक, भाजपचे मध्यवर्ती कार्यालय आदी ठिकाणी भाजपचे गटनेते जमनुदास पुरस्वानी, नगरसेवक प्रदीप रामचंदानी, मनोज लासी, राजेश टेकचंदानी आदी नगरसेवक व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटून आणि फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष केला. शिवाजी चौकात पोलिसांनी फटाक्याची आतिषबाजी करण्यात मनाई केली. या प्रकाराने नाराज झालेल्या पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट पोलिसांना धक्काबुक्की केली.मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरवाडकर यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली. या प्रकाराने भाजपमधील सावळागोंधळ उघड झाला.महापालिका महापौरपदाची निवडणूक शुक्रवारी पार पडून भाजपचे बहुमत असताना ओमी टीमच्या समर्थक नगरसेवकांच्या बंडामुळे शिवसेनेच्या लीलाबाई अशान आणि उपमहापौर पदी रिपाइंचे भगवान भालेराव निवडून आले. महापौर निवडणुकीदरम्यान भाजपा नगरसेवकांच्या गैरवर्तन, धक्काबुक्की, आरोप-प्रत्यारोपाची चर्चा शहरात होत आहे. महापौर निवडणुकीदरम्यानच्या नगरसेवकांच्या गैरवर्तनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर टीकेची झोड उठली. मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरवाडकर यांनी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असल्याचे सांगितले.भाजप पदाधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात नेलेशिवाजी चौकात पोलिसांना केलेल्या धक्काबुक्कीप्रकरणी काही भाजप पदाधिकाºयाना मध्यवर्ती पोलीस ठाण्यात बसून ठेवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. भाजप वरिष्ठ नेत्यांच्या दबावामुळे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता, अशी प्रतिक्रिया नागरिकांसह इतर पक्षांच्या नेत्यांनी केली.मीरा-भार्इंदरमध्ये भाजपचा जल्लोषमीरा रोड : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याचे सकाळच्या सुमारास वृत्त येताचमीरा-भार्इंदरमध्ये भाजपच्या लोकप्रनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष केला. आमदार गीता जैन यांनी भाजपा नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह स्वतंत्रपणे आनंद साजरा केला. लाडू - पेढे वाटत फटाके फोडण्यात आले. तर माजी आमदार नरेंद्र मेहतांसह महापौर डिंपल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैतींसह मेहता समर्थक नगरसेवक, पदाधिकाºयांनी आपली जल्लोषाची वेगळी चूल मांडलेली दिसली. सरकार स्थापनेमुळे विकासकामांना गती येऊन शेतकºयांना मोठा दिलासा मिळेल, असे आ. जैन यांनी सांगितले .भाजपचा अंबरनाथमध्ये जल्लोषअंबरनाथ : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानिमित्त अंबरनाथ येथे भाजपच्या वतीने शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. भाजपच्या विजयाच्या घोषणाबाजी यावेळी करण्यात आले. यावेळी भाजपचे ठाणे पालघर विभागीय उपाध्यक्ष किसनराव तारमळे, शहराध्यक्ष भरत फुलोरे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पौर्णिमा कबरे, नगरसेवक तुळशीराम चौधरी, अभिजित करंजुले आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.बदलापूरमध्ये भाजपकार्यकर्त्यांचा जल्लोषबदलापूर : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याचा आनंद व्यक्त केला. बदलापूरमधील भाजप कार्यकर्त्यांनी पेढे लाडू वाटून एकच जल्लोष केला. आमदार किसन कथोरे यांच्या संपर्ककार्यालयात भाजपच्या पदाधिकाºयांनी गर्दी केली. एकमेकांना पेढे आणि लाडू वाटून आनंद व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जयजयकार घोषणा देत मिरवणूक काढण्यात आली. पश्चिमेकडून पूर्वेकडे ही मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. भाजप गटनेते राजेंद्र घोरपडे, शहर अध्यक्ष संभाजी शिंदे, माजी उपनगराध्यक्ष शरद तेली, उपनगराध्यक्षा राजश्री घोरपडे, नगरसेवक प्रशांत कुलकर्णी, किरण भोईर, महिला आघाडी अध्यक्षा मेघा गुरव, प्रणिती कुलकर्णी, मनीषा आंबेकर, प्रिया झोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जल्लोषात सहभागी झाले होते.राज्यात सरकार स्थापन झाल्याने भिवंडीत कार्यकर्त्यांचा जल्लोषभिवंडी : राज्याच्या चौदाव्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याच राजकीय पक्षाला बहुमत मिळाले नाही. त्यामुळे महिनाभरापासून सत्तास्थापनेचा तिढा सुरू आहे. शनिवारी सकाळी भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी राजभवनात जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन राज्यात सत्ता स्थापन केली आहे. ही बातमी सर्वत्र पसरताच भिवंडी शहरात भाजप कार्यकर्त्यांनी जुना आग्रा रोडवरील भाजप कार्यालयासमोर एकमेकांना पेढे भरवून एकच जल्लोष करून आपला आनंद व्यक्त केला.यावेळी भाजपचे शहराध्यक्ष अ‍ॅड. हर्षल पाटील, आमदार महेश चौघुले, ज्येष्ठ नगरसेवक निलेश चौधरी, यशवंत टावरे, दिनेश पाटील, महिला अध्यक्ष ममता परमाणी आदींसह शेकडो भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यात सत्ता स्थापनेसाठी विलंब होत असल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.यादरम्यान शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या राजकीय पक्षांनी एकत्रित येत महाआघाडीच्या झेंड्याखाली सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्यासाठी या तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चेचे गुºहाळ सुरू होते. चर्चांमधून काही सकारात्मक निष्कर्ष निघत नसल्याने शेवटी ऐनवेळी राष्ट्रवादीचे विधानसभा गटनेते अजित पवार यांनी भाजपसोबत घरोबा करून सरकार स्थापनेचा निर्णय घेतला.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरBJPभाजपा