भिवंडी:दि.१३- स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सुस्थितीत असलेली रहिवासी इमारत अति धोकादायक असल्याचे फलक लावून रहिवासी इमारतीतील नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या भिवंडी महापालिकेच्या माजी नगरसचिवावर मनपाच्या प्रभाग अधिकाऱ्यांनी सोमवारी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कादर सत्तार सोळंकी असे भिवंडी मनपाच्या माजी नगर सचिवाचे नाव असून त्याने मनपा प्रभाग समिती क्रमांक तीनच्या कार्य कक्षेत येणाऱ्या पटेल नगर येथील सिद्धिक पटेल या रहिवासी इमारतीच्या दर्शनी भागावर स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सदरची इमारत अतीधोकादायक असल्याचे लाल रंगाने रंगविले होते.मात्र ही इमारत धोकादायक घोषित केल्याचे समजतात नागरिक रहिवासी इमारतीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.त्यानंतर इमारतीतील रहिवासी इमरान रमजान निरबान यांनी मनपाचे प्रभाग अधिकारी सोमनाथ सोष्टे यांच्याकडे सदर बाबत खुलासा मागितला असता सोष्टे यांनी आपल्या प्रभागातील शहर विकास विभागाचे बिट निरीक्षक व बिट मुकादम यांच्याकडे याबाबत चौकशी केली असता मनपाच्या वतीने या इमारतीला धोकादायक असल्याची कोणतीही नोटीस काढली नसल्याचे निष्पन्न झाले.या बाबत चौकशी केली असता हा खोडसाळपणा मनपाच्या माजी नगरसचिव असलेल्या कादर सोळंकी यांनी केले असल्याची समजताच सोमनाथ सोष्टे यांनी सोळंकी विरोधात गुन्हा नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सोळंकी हे मनपाचे माजी नगर सचिव असल्याने इमारत अति धोकादायक असल्याचे नागरिकांना सांगून रहिवाशांकडून आर्थिक लूट करण्याचा सोळंकीचा डाव असल्याचे इमारतीच्या रहिवाशांनी सांगितले असून सोळंकी या यांच्या विरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती देखील इमारतीचे रहिवासी रहिवाशांनी दिली आहे.