ठाणे : मोबाइल फोनचे सीडीआर (कॉल्सचा तपशील) कंपन्यांकडून मिळवण्यासाठी आरोपींनी यवतमाळ येथील पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयीन ई-मेलचा वापर केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. पोलिसांनी सीडीआरप्रकरणी बुधवारी आणखी दोघांना अटक केली असून त्यांच्या चौकशीत ही माहिती मिळाली. सीडीआर बेकायदेशीरपणे मिळवून विकणाºया टोळीचा पर्दाफाश गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१ने गतआठवड्यात केला. त्यांच्या चौकशीतून पुणे येथे वास्तव्यास असलेल्या आणखी दोन आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी जसप्रीतसिंग मारवा (३२) आणि अजिंक्य नागरगोजे (२५) यांना अटक केली. मारवा मूळचा मुंब्रा येथील असून तो व्होडाफोनशी संलग्न एका कंपनीमध्ये नोकरीला होता. तर अजिंक्य यवतमाळचा असून तो सायबर तज्ज्ञ आहे. अजिंक्य याला यवतमाळ पोलिसांची वेबसाइट तयार करण्याचे काम मिळाले होते. त्या वेळी यवतमाळच्या पोलीस अधीक्षकांचा कार्यालयीन ई-मेल आयडी आणि पासवर्ड त्याने चोरला होता. सीडीआर मिळवण्यासाठी त्याने याच ई-मेल आयडीचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींमध्ये जिगर विनोद मकवाना आणि प्रशांत श्रीपाद पालेकर यांचाही समावेश आहे.>रजनी पंडित यांच्या कोठडीत वाढख्यातनाम गुप्तहेर रजनी पंडित यांना ठाणे पोलिसांनी गत शुक्रवारी अटक केली होती. कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी ११ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे.
यवतमाळ पोलीस अधीक्षकाच्या ई-मेलचा गैरवापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 5:28 AM