उल्हासनगर : शहरातील मध्यवर्ती रुग्णालयातील अंतर्गत कामासाठी आमदार कुमार आयलानी यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पाहिल्याच दिवसी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निधीची मागणी केली. रुग्णालयातील अंतर्गत रस्त्यासह अन्य कामाचा समावेश यामध्ये असल्याचे आयलानी म्हणाले.
उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, मुरबाड, शहापूर, ग्रामीण परिसर, अंबरनाथ, बदलापूर आदी ठिकाणाहून शेकडो नागरीक दररोज उपचार करण्यासाठी येतात. बाह्यरुग्ण विभागात दररोज १५०० पेक्षा जास्त रुग्णांची नोंदणी होत असून जिल्हात ही रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी मध्यवर्ती रुग्णालय अध्यावत करण्याचे संकेत आमदार आयलानी यांनी गेल्या आठवड्यात विकास कामाचे उदघाटन करतेवेळी दिले होते. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमदार कुमार आयलानी यांनी सहभाग घेऊन, मध्यवर्ती हॉस्पिटल मधील विविध कामे करणे, म्हारळगाव पाडा मधून जवसाई मार्गे अंबरनाथ पर्यंत रस्ता तयार करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली. तसे मंत्री चव्हाण यांना प्रत्यक्ष निवेदन आयलानी यांनी दिले आहे.