शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

मिरा-भार्इंदर उन्नत मार्गासाठी एमएमआरडीएचे २५६ कोटी कर्ज

By admin | Published: October 16, 2015 2:57 AM

मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रातील वीर सावरकर चौक ते राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ असा छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असून या रस्त्यावर ८ सिग्नल असल्याने येथे वाहतूककोंडी होत आहे

अजित मांडके, ठाणे मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रातील वीर सावरकर चौक ते राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ असा छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असून या रस्त्यावर ८ सिग्नल असल्याने येथे वाहतूककोंडी होत आहे. तसेच येथून जाण्यासाठी ४५ मिनिटांचा कालावधी लागतो. त्यामुळे वाहतूक कोंडीवर तोडगा निघाला आहे. आता या मार्गावर उन्नत मार्ग व अंडरबायपास उभारण्यासाठी एमएमआरडीए २५६.३४ कोटींचे कर्ज देणार असून त्याला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या मार्गातील कोंडी फुटून वाहतूकदारांचा वेळही वाचणार आहे.सध्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यास ४५ मिनिटांहून अधिक कालावधी लागतो. या समस्येवर उपाय करण्यासाठी मीरा-भार्इंदर महापालिकेने या मार्गावर सिग्नलच्या ठिकाणी उन्नत मार्ग व अंडरबायपास उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, यामध्ये भार्इंदर (पू.) भागातील वाहनांना जाण्यासाठी वीर सावरकर चौक (गोल्डन नेस्ट सर्कल) व दीपक हॉस्पिटल जंक्शन येथे उन्नत मार्ग (फ्लायओव्हर ब्रीज) बांधणे, सिल्व्हर पार्क जंक्शन व प्लेझंड पार्क जंक्शन येथे अंडरपास बांधणे, एसके स्टोन जंक्शन, कनकिया जंक्शन व शिवार उद्यान जंक्शन (एन.एच. हायस्कूल रस्ता व सरदार पटेल रस्ता) या ठिकाणी एक उन्नत मार्ग बांधणे, काशिमीरा नाक्यावर पादचारी पूल बांधणे आदी कामे यात प्रस्तावित केली आहेत. या प्रकल्पासाठी २५६.३४ कोटींचा खर्च अपेक्षित असून तो २ ते ३ वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता या प्रकल्पासाठी होणारा खर्च शक्य नसल्याने त्यासाठी शासकीय अथवा निमशासकीय संस्थेकडून कर्ज उपलब्ध करून देण्याबाबतचा ठराव मीरा-भार्इंदर महापालिकेने २५ नोव्हेंबर २०१४ रोजी मंजूर केला होता. तर, आयुक्तांनी यासाठी एमएमआरडीएकडून कर्ज घेण्यास शासनाची मान्यता मिळावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार, आता शासनाने याला मान्यता दिल्याने या उन्नत मार्गाचा मार्ग मोकळा झाला आहे.