शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
2
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
3
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
4
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
5
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
6
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
7
चंद्रशेखर यांच्या पक्षाला हरयाणात मोठा झटका; अनेक उमेदवारांना 500 पेक्षाही कमी मते...
8
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
9
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
10
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
11
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
12
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
13
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
14
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
15
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
16
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
17
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
18
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
19
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
20
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान

एमएमआरडीएचा एमएसआरडीसीला ‘जोर का झटका’; ‘समृद्धी’साठी दिलेले हजार कोटी व्याजासह वसूल करणार

By नारायण जाधव | Published: November 22, 2022 2:46 PM

समृद्धी महामार्गासाठी एमएमआरडीएसह सिडको, म्हाडा, झोपू, एमआयडीसी यांच्याकडून एमएसआरडीसीने हजारो कोटी रुपये कर्ज म्हणून घेतले आहेत.

नारायण जाधव -

ठाणे : बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी दिलेल्या एक हजार कोटींच्या कर्जाचे समभागात रूपांतर करण्यास एमएमआरडीएने सपशेल नकार दिला आहे. एवढेच नव्हे, तर हे एक हजार कोटींचे कर्ज व त्यावरील ३० जून २०२२ पर्यंतचे ४९८ कोटी ८६ लाख रुपये व्याज आणि १ जुलै २०२२ पासून दररोजचे १२ लाख ६० हजार २९३ रुपये विलंब आकार म्हणून वसूल करण्याचा ठराव मंजूर करून एमएमआरडीएने एमएसआरडीसीला चांगलाच झटका दिला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठराव मंजूर झाल्याने एमएसआरडीसी चांगलीच संकटात सापडली आहे.

समृद्धी महामार्गासाठी एमएमआरडीएसह सिडको, म्हाडा, झोपू, एमआयडीसी यांच्याकडून एमएसआरडीसीने हजारो कोटी रुपये कर्ज म्हणून घेतले आहेत. शासनाने जबरदस्ती करून त्यांना कर्ज देण्यास भाग पाडून व्याज देण्याचे आमिष दाखविले होते. परंतु त्याचे अचानक १३ ॲागस्ट २०२० रोजी एमएसआरडीसीच्या समभागात रूपांतर केले. हे करताना सार्वजनिक बांधकाम विभागाने या महामंडळाला कोणत्याही प्रकारे विचारात न घेता  परस्पर जीआर काढला होता. यामुळे या कोट्यवधींच्या व्याजास उपरोक्त महामंडळांना मुकावे लागले आहे.  यानंतर एमएसआरडीसीने डीमॅट खात्याची माहिती मागितली हाेती.

१ जुलै २०२२ पासून रोज १२ लाख ६० हजार विलंब आकारमुंबई नागरी विकास प्रकल्प फिरता निधी विनियम १९८८ नुसार  दिलेल्या कर्जाचे समभागात रूपांतर करता येत नसल्याचे एमएमआरडीएने एमएसआरडीसीला कळविले आहे. त्यानुसार २० ऑक्टोबर २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत एक हजार कोटींचे कर्ज व त्यावरील ३० जून २०२२ पर्यंतचे ४९८ कोटी ८६ लाख रुपये व्याज आणि १ जुलै २०२२ पासून दररोजचा १२ लाख ६० हजार २९३ रुपये विलंब आकार म्हणून वसूल करण्याचा ठराव मंजूर केला. 

या साडेपाच हजार कोटी कर्जाचे समभागात रूपांतर करताना त्यांना ८% लाभांश देण्याचे प्रलोभन दाखविले होते. परंतु आता एमएमआरडीएने त्यास नकार दिल्याने उर्वरित चार महामंडळे तशी हिम्मत दाखविणार काय याकडे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गmmrdaएमएमआरडीएState Governmentराज्य सरकार