शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
2
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
3
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
4
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
5
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
6
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
7
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
8
बाळासाहेब ठाकरेंच्या एका वाक्याने निवडला गेला होता शिवसेनेचा उमेदवार; निकाल काय लागला?, वाचा...
9
शनीचा राजयोग: ८ राशींना धनलाभ, आर्थिक स्थितीत वृद्धी; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, यश-प्रगती!
10
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
11
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही
12
परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’, राज्य, भाषानिहाय डेटा बँक करून जबाबदारी
13
'डिमोशन' झालं तरी KL Rahul मध्ये सुधारणा नाहीच; कसं मिळेल रोहितच्या जागी 'प्रमोशन'?
14
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!
15
अक्षय कुमारचा कॉमेडी सिनेमा 'भागम भाग'चा येणार सीक्वेल? गोविंदा, परेश रावलसोबत करणार धमाल
16
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
17
२०१९ च्या विधानसभेत मिळालेल्या जागा राखताना महायुतीची होणार दमछाक, उत्तर मध्य आणि पूर्व मुंबईत महायुतीसमोर मविआचे तगडे आव्हान
18
Chhath Puja 2024: छठ पूजा; गतवैभव प्राप्तीसाठी द्रौपदीनेही केले होते हे कडक व्रत!
19
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: शरद पवार फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे मालक, तर सुप्रिया सुळे...

आडमुठ्या मनपांमुळे बिघडले एमएमआरडीएचे नियोजन

By admin | Published: December 14, 2015 1:10 AM

चार महापालिकां, दोन नगरपालिकांना भेडसावणारी कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुमारे दोन हजार कोटी रुपये खर्चाचे कचरा

चार महापालिकां, दोन नगरपालिकांना भेडसावणारी कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुमारे दोन हजार कोटी रुपये खर्चाचे कचरा विल्हेवाट प्रकल्प तीन ठिकाणी नियोजित केले आहेत. पण कचरा विल्हेवाटीचा दर परवडणार नसल्याचे कारण पुढे करीत महापालिकांनी ते प्रकल्प रखडवले आहेत.आशिया खंडातील सर्वात मोठे तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्प तीन टप्प्यात होणार आहेत. पहिला प्रकल्प तळोजा एमआयडीसीजवळ अंबरनाथ तालुक्याच्या साखरोली, कारवले, उसाटणे, नितलस आणि वाडी या पाच गावांच्या मध्यभागी भाल गावाच्या गावकुसाला होणार होता. २२ महिन्याच्या कालावधीत सुरू करण्याची ग्वाही एमएमआरडीएने मागील वर्षी दिली होती. तेथे दोन हजार ५०० मेट्रीक टन कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. एक मेट्रीक टन कचऱ्यासाठी महापालिकाना केवळ ८४६ रूपये खर्च करावा लागणार होता. मात्र हा खर्च परवडणारा नसल्याचा पळपुटेपणा महापालिकांनी केला . मुख्यमंत्र्याना भेटून ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी महापालिकांना या प्रकल्पाचा लाभ होणार होता. पण एक वर्षाच्या डीपीडीसीतील चर्चेनंतरही नाकर्तेपणामुळे तो योग अद्यापही आला नाही. डंपिंगसाठी जागा नसल्याचे कारण पुढे करून सर्वच महापालिका अनधिकृत डंपिंगवर कचरा टाकण्यात धन्यता मानत आहेत. कचऱ्याच्या नावाखाली अन्यमार्गांनी दरवर्षी हजारो कोटी खर्च होतो. परंतु कचरा विल्हेवाटीची समस्या सोडण्याऐवजी तिला जटील करण्याचे काम महापालिका करीत असल्याची चर्चा समस्याग्रस्त नागरिकांमध्ये सुरू आहे.पहिल्या टप्यातील या प्रकल्पावर एमएमआरडीए एक हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. २६४ हेक्टर जागेपैकी १०७ हेक्टर जमीन सरकारी असून १५७ हेक्टर जमीन शेतकऱ्यांची राहणार आहे. प्रकल्प उभा राहात असलेल्या ठिकाणी अंबरनाथ एमआयडीसी , तळोजा एमआयडीसी आणि मलंगगड- कल्याण रस्ता हे तीन प्रमुख रस्ते एकत्र येत आहेत. जिल्ह्यातील महापालिका व नगरपालिकांमधील सुमारे ४५ लाख लोकसंख्येचा कचरा या प्रकल्पात येणार आहे. त्यासाठी सुमारे २५ वर्षाची लोकसंख्या विचारात घेतली आहे. येथे २५ किमी.च्या परिसरातील कचरा येणार आहे. तर दुसरा प्रकल्प शिळफाटाजवळ कल्याण, अंबरनाथ एमआयडीसी रस्त्याला लागून २५९ हेक्टर जागेवर प्रस्तावित आहे. तिसरा टप्पा भिवंडीच्या दापोडे परिसरातील ३५२ हेक्टर भूखंडावर ‘ई कचरा विल्हेवाट’ केली जाणार आहे. या तिन्ही प्रकल्पांमध्ये २०३१पर्यंत प्रत्येक दिवशी सुमारे १८ हजार ३२७ मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया होईल. पण पहिलाच टप्पा रखडल्याने पुढील प्रकल्पांचे प्रस्ताव पडून आहे.