- नितिन पंडीत
भिवंडी: भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा चिंचोटी महामार्गावर सध्या खड्डयांचे साम्राज्य पसरले असून अंजुरफाटा ते खारबाव पर्यंत या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या खड्डेमय रस्त्यांवरून वाहन चालवितांना वाहन चालकांना अनेक अडचणी येत आहेत . रस्त्याच्या दुरावस्थेमुळे स्थानिक नागरिकांसह वाहन चालक व प्रवासी हैराण झाले आहेत.
रस्त्याच्या या दुरावस्थे विरोधात मंगळवारी अंजुरफाटा येथे मनसेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व मनविसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष संतोष साळवी यांनी केले. या आंदोलनाप्रसंगी मनसेने रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी आंदोलनादरम्यान उपस्थित असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे लावून धरली होती. डिसेंबर पर्यंत या रस्त्यात पडलेले खड्डे भरण्यात येतील असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आंदोलकांना देण्यात आले.
सुप्रीम कंपनीकडून या महामार्गावर टोल वसुली करण्यात येत आहे. सुप्रीम कंपनीची टोल वसुली जोरात सुरु आहे मात्र रस्त्याच्या दुरुस्तीकडे सुप्रीम कंपनीचे पुरता दुर्लक्ष झाले असल्याने या महामार्गाची आज वाताहात झाकी आहे. त्याविरोधात आज मनसेने आंदोलन केले. दरम्यान डिसेंबर पर्यंत रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले नाही तर मनसेच्या वतीने खळ खट्याक आंदोपन करण्यात येईल असा इशारा मनविसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष साळवी यांनी दिली आहे.