शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

स्मशानभूमीविरोधात मनसे, राष्ट्रवादीही आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 3:01 AM

घोडबंदर भागातील मानपाडा, टिकुजिनीवाडी भागातील स्मशानभूमीवरून शिवसेनेतील आमदार प्रताप सरनाईक आणि सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्यातील संघर्ष आता रस्त्यावर आलेला असतांना आता मनसे आणि राष्ट्रवादीनेदेखील तिला मंगळवारी विरोध दर्शविला.

ठाणे : घोडबंदर भागातील मानपाडा, टिकुजिनीवाडी भागातील स्मशानभूमीवरून शिवसेनेतील आमदार प्रताप सरनाईक आणि सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्यातील संघर्ष आता रस्त्यावर आलेला असताना आता मनसे आणि राष्ट्रवादीनेदेखील तिला मंगळवारी विरोध दर्शविला आहे. रेप्टॉकॉसच्या स्मशानभूमीमुळे वर्तकनगर, शास्त्रीनगरच्या रहिवाशांना त्रासच होणार असल्याची भूमिका मनसेनेही घेतली असून या स्थानिकांचा आमदारांनी विचार करावा, अशी मागणी केली आहे. याविषयावर आमदार प्रताप सरनाईकांना आता स्वपक्षीयांनीच नव्हे तर मनसे आणि राष्ट्रवादीनेही घेरल्याने या स्मशानभूमीबाबत आता शिवसेनाश्रेष्ठींसह प्रशासन आता काय भूमिका घेते, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.या स्मशानभूमीसाठी सोमवारी सरनाईक यांच्या मोर्चात वर्तकनगर, शास्त्रीनगर येथील रहिवाशांसह स्थानिक लोकप्रतिनिधीही नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. स्थानिकांचा तिला विरोध असतांनाही त्यांचे मत लक्षातच घेतले जात नसल्याने वेळ पडल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही मनसेने मंगळवारी दिला. दुसरीकडे राष्टÑवादीनेदेखील मुल्लाबाग येथील संभावीत स्मशानभूमीला विरोध दर्शविला आहे. वस्तीत ती होणे शक्यच नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच रेप्टाकॉस येथे स्मशानभूमीचीही गरज नसल्याचे मतही व्यक्त केले आहे.पोखरण रोड नं.१ येथील रेप्टाकॉस कंपनीच्या सुविधा भूखंडावर व मुल्लाबाग येथील सुविधा भूखंडावर प्रदूषणविरहित पर्यावरणपूरक स्मशानभूमीची निर्मिती करण्यास मान्यता मिळाली असली तरी रेप्टाकॉस कंपनीचा भूखंड हा अ‍ॅमिनीटी प्लॉट असल्याने त्याठिकाणी ती उभारता येऊ शकत नसल्याचे मत आता व्यक्त करण्यात येत आहे.>भरवस्तीत स्मशानभूमी नकोमूळात स्थानिकांना विश्वासात घेण्यात आले नसून ज्या ठिकाणी स्मशानभूमी होणे शक्य नाही, त्याठिकाणी हट्ट करायचा कशाला. त्यामुळे वेळ पडल्यास या विरोधात रस्त्यावर उतरू.- संदीप पाचंगे, मनविसेनेचे ठाणे शहर अध्यक्षभर वस्तीत स्मशानभूमी कशी काय होऊ शकते. त्यामुळे तिला आमचा विरोध हा राहणारच आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा शिवसेना पक्षांतर्गत सुरूअसलेला स्मशानभूमीचा खेळ थांबू द्या, मग आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. - मिलिंद पाटील,विरोधी पक्षनेते -ठामपा