लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: आपला जीव धोक्यात घालून उपवन तलावात आत्महत्येचा प्रयत्न करणा-या महिलेचे प्राण वाचविणा-या वर्तकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल गजेंद्र सोनटक्के आणि संतोष मोरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्तकनगर शाखेतर्फे शनिवारी विशेष सत्कार करण्यात आला. नवनिर्माण सेनेच्या वर्तकनगर शाखेतर्फे शनिवारी विशेष सत्कार करण्यात आला. या दोघांच्याही कार्याचे मनसेने कौतुक केले.वर्तकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कान्स्टेबल गजेंद्र सोनटक्के आणि पोलीस नाईक एस. पी. मोरे हे शुक्रवारी सायंकाळी उपवन तलाव परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी एक महिला तलावात आत्महत्येचा प्रयत्न करीत असल्याची माहिती त्यांना दोन तरुणींनी दिली. ही माहिती मिळताच सोनटक्के यांनी त्या दिशेने धाव घेतली. तोपर्यंत या महिलेने तलावात उडी घेतली. तिच्यापाठोपाठ सोनटक्के यांनीही उडी घेऊन अवघ्या काही मिनिटांमध्ये तिला या तलावातून सुखरुप बाहेर काढले. वर्तकनगर पोलिसांनी केलेल्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल मनसेचेठाणे शहर सचिव रवींद्र सोनार, विधानसभा सचिव सौरभ नाईक, ठाणे सांस्कृतिक विधानसभा अध्यक्ष प्रसाद भांदिगरे, उपविभाग अध्यक्ष निलेश चौधरी, शाखाध्यक्ष संतोष निकम, सागर भोसले, हेमंत महाले, मनविसे उपविभाग अध्यक्ष निखिल जाधव आदींनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात सोनटक्के आणि मोरे या पोलिसांचा सत्कार केला. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड हेही उपस्थित होते.
ठाण्यात कर्तव्यदक्ष पोलिसांच्या कार्याचे ‘मनसे’ कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 11:28 PM
उपवन तलावात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे प्राण वाचविणा-या वर्तकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल गजेंद्र सोनटक्के आणि संतोष मोरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्तकनगर शाखेतर्फे शनिवारी विशेष सत्कार करण्यात आला.
ठळक मुद्देजीव धोक्यात घालून वाचविले होते महिलेचे प्राण ठाण्याच्या उपवन तलाव येथील घटना