ठाणे - शिवसेनेला वचननाम्याची आठवण करून देण्यासाठी ठाणे महानगर पालिकेसमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी (१७ सप्टेंबर ) थाळीनाद आंदोलन करण्यात आले. ठाणेकरांना दिलेली आश्वासन पूर्ण करा अन्यथा उपोषण करू असा इशारा मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. तसेच आम्ही मराठा क्रांती मोर्चासोबत आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या मागे मनसे खंबीर उभी असून थोड्याच दिवसांत मराठा आरक्षणाबाबत राज ठाकरे आपली भूमिका मांडतील असं देखील अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.
"शिवसेनेने दिलेल्या वाद्यातील एकही गोष्ट साडेतीन वर्षांत पूर्ण केली नाही. जोपर्यंत दिलेली आश्वासने पूर्ण होत नाहीत तोपर्यंत शिवसेनेने नवीन आश्वासने देऊ नये आणि दिल्यास मी उपोषणाला बसेन" असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे. यासोबतच जाधव यांनी भाजपावर ही निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. भारतीय जनता पक्ष आतापर्यंत नेते चोरत होते हे आम्ही ऐकलं होतं पण आता ते आंदोलन देखील चोरायला लागली आहेत असं म्हटलं आहे.
"का हूआ तेरा वादा" हा आमचा बॅनर सात दिवसांपूर्वीच फेसबूकवर आला आहे. तुम्ही सत्तेत आहात, २४ नगरसेवत आहेत मग ते बोलत का नाहीत? असा सवालही मनसेने केला आहे. तसेच ठाणेकर भूलथापांना आता बळी पडणार नाही. ठाणेकरांचा आवाज म्हणून आम्ही प्रत्येकवेळी येत राहू, जुन्या इमारतीतील हजारो लोक घराबाहेर आहेत त्यांच्यासाठीही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आवाज उठवणार असून याची सुरुवात झाली असल्याचं देखील अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.
"मनसे हा एकमेव पक्ष आहे ज्याने विधानसभेची निवडणूक हारल्यानंतर देखील टोलमुक्तीसाठी आंदोलन केलं आहे. कोरोनाच्या या संकट काळातही मनसेचा प्रत्येक पदाधिकारी काम करत आहे. पुढच्या आठवड्यात २०१७ प्रमाणे २०१२ रोजी शिवसेने दिलेल्या वचननाम्याचा पंचनामा करणार आहे. मनसे मराठा क्रांती मोर्चाच्या मागे खंबीर उभी असून थोड्याच दिवसांत मराठा आरक्षणाबाबत राज ठाकरे आपली भूमिका मांडतील" असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
"भाभीजी के पापड' खाऊन कोरोना बरा होतो का?", संजय राऊतांचा भाजपाला सणसणीत टोला
Video - "या' गर्दीत कोरोना होत नाही असा सरकारचा समज आहे का?', मनसे नेत्याचा सवाल