लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाण्यात उद्धव ठाकरे आल्यानंतर जे आंदाेलन झाले, त्यात मनसैनिकांचा हात आणि पायच आहे असे नव्हे, तर संपूर्ण जबाबदारी आम्ही घेतली आहे. ज्यांनी हे आंदाेलन केले त्या मनसैनिकांचे अभिनंदन. पण राज ठाकरे यांच्या गाडीवर बीडमध्ये सुपाऱ्या फेकण्याचे काम काेणाच्या आदेशाने झाले? राहुल गांधी की साेनिया गांधी? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून रविवारी केला.
ठेकेदारांकडून खाेके घेणे ही सुपारी हाेऊ शकते, पण भूमिका बदलणे म्हणजे सुपारी हाेऊ शकत नसल्याचे सांगत, आम्ही काळाेखात हल्ला केला नाही, तुम्ही काळाेखात आलात. इतकीच हिंमत हाेती तर तुमचा सैनिक मार खात असताना तुम्ही खाली यायचे हाेते, असा टोलाही जाधव यांनी ठाकरेंना लगावला.
जरांगेंबाबत योग्य वेळी राज ठाकरे उत्तर देतील
- खासदार संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर जाधव यांनी त्यांचा समाचार घेतला.
- उद्धवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावरही त्यांनी टीका केली. जरांगेंबाबत याेग्य वेळी राज ठाकरे उत्तर देतील, असेही जाधव यांनीी स्पष्ट केले.
- मनसे कार्यालयाला संरक्षण
मनसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या मोटारीवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील मनसे कार्यालयाच्या ठिकाणी पोलिसांनी रविवारी कडेकाेट बंदाेबस्त ठेवला हाेता.