डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त गोविंद बोडके यांनी बुधवारी शहरातील विविध विकासकामांची पाहणी केली. ठाकुर्ली, डोंबिवली पूर्व-पश्चिमेत केलेल्या दौऱ्यादरम्यान आयुक्तांसमोर मनसेचे विरोधीपक्षनेते मंदार हळबे आणि भाजपाचे नगरसेवक राजन सामंत यांच्यात बाचाबाची झाली. रामनगर प्रभागातील एका कल्व्हर्टच्या कामावरून झालेल्या या वादात आयुक्तांनी मध्यस्थी करत दोन्हींकडच्या बाजू तपासून योग्य कामाबाबत ती कार्यवाही करू, असे स्पष्ट केल्यानंतर वादावर पडदा पडला.आयुक्तांनी दौºयात सुरुवातीला कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्याची पाहणी केली. पत्रीपुलानजीक रस्त्याचे काम रखडल्याकडे बोडके यांचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती राहुल दामले, नगरसेविका प्रमिला चौधरी, खुशबू चौधरी, नगरसेवक संदीप पुराणिक, माजी नगरसेवक श्रीकर चौधरी आदी उपस्थित होते. या पदाधिकाºयांसमवेत आयुक्तांनी ठाकुर्ली उड्डाणपुलाला भेट देऊन तेथील अंतिम टप्प्यात सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.त्यानंतर, गणपती मंदिर चालवत असलेले महापालिकेचे वाचनालय आणि सूतिकागृहाचीही पाहणी केली. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. तर, महापालिकेच्या अर्थसंकल्पात अडीच कोटींची तरतूद आहे. सूतिकागृहाच्या नूतनीकरणासाठी १८ कोटींचा खर्च असल्याने सध्याच्या उपलब्ध निधीत पहिल्या टप्प्याचे काम सुरू करण्याचा प्रयत्न राहील, असे बोडके म्हणाले.पूर्वेकडील स्थानक परिसराचीही पाहणी बोडके यांनी केली. तेथे विरोधीपक्षनेतेहळबे आणि नगरसेवक सामंत, माजी नगरसेवक व शिवसेना उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, माजी नगरसेविका मंगला सुळे आदी उपस्थित होते. हळबे यांच्या प्रभागात कल्व्हर्टचे काम केले जाणार आहे. त्या परिसराची आयुक्तांनी पाहणी केली. या कामावरून तसेच एका इमारतीच्या पुनर्विकासावरून हळबे आणि सामंत यांच्यात आयुक्तांसमोरच बाचाबाची झाली. हळबे नेहमीच राजकारण करतात. महापालिकेचे अधिकारी हळबे यांच्या पगारावर पोसले जातात का, असा सवाल आयुक्तांना सामंत यांनी विचारला. तर, नागरिकांच्या मागणीनुसारच कामे करतो, अशा शब्दांत पलटवार करत हळबे यांनी सामंत यांचे आरोप फेटाळून लावले. अखेर, आयुक्तांनी मध्यस्थी करत वादावर पडदा टाकला. या वेळी थरवळ यांनीही अनेक विकासकामे रखडली आहेत. पाठपुरावा करूनही ती कामे होत नसल्याकडे लक्ष वेधले. पाटकर रोडवर चुकीच्या पद्धतीने पदपथ बांधल्याचे हळबे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.शास्त्रीनगर रुग्णालयाचीही आयुक्तांनी पाहणी केली. विष्णूनगर प्रभागात केलेल्या पाहणीदरम्यान रस्त्यावरील कचरा त्वरित उचलावा, अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे तातडीने भरावेत, स्थानक परिसरातील कोंडी दूर करावी, अशी मागणी नगरसेविका मनीषा धात्रक यांनी आयुक्तांकडे केली. दौºयाच्या वेळी शहरअभियंता प्रमोद कुलकर्णी, उपायुक्त नितीन नार्वेकर, नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे, उपअभियंता प्रमोद मोरे अधिकारी होते.अन पुन्हा परतले फेरीवालेआयुक्त गोविंद बोडके यांच्या दौºयादरम्यान डोंबिवली पूर्वेला रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाले गायब झाले होते. परंतु, आयुक्त कल्याणला परतताच फेरीवाल्यांचे पुन्हा अतिक्रमण झाल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
मनसे-भाजपा नगरसेवकांत बाचाबाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 3:06 AM