शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

अयोध्येच्या दौऱ्याची तारीख राज ठाकरे करणार जाहीर; शिवसेनेच्या झालेल्या कोंडीचा लाभ उठवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2022 10:35 AM

- संदीप प्रधान ठाणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बहुप्रतिक्षित अयोध्या दौऱ्याची तारीख येत्या शनिवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आयोजित ...

- संदीप प्रधान

ठाणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बहुप्रतिक्षित अयोध्या दौऱ्याची तारीख येत्या शनिवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आयोजित मेळाव्यात जाहीर होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. अयोध्येला आपण का जायचे, ही भूमिकाही राज ठाकरे जाहीर करणार आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करताना केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या ईडीच्या वापराबाबतही ते भाष्य करणार आहेत.

राज ठाकरे हे अयोध्येला जाणार, असे त्यांनी जाहीर केले होते. मात्र कोरोना निर्बंधामुळे त्यांचा दौरा पुढे ढकलला गेला. आता कोरोनाचे निर्बंध सैलावले असल्याने राज ठाकरे हे अयोध्या दौऱ्याची तारीख शनिवारी जाहीर करणार आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्यावरून जाहीर प्रखर भूमिका घेण्यात अडचण आहे. काँग्रेसच्या अस्वस्थ आमदारांनी अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटीची वेळ मागितली आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली असल्याने हीच संधी साधत मनसे हिंदुत्वाची जहाल भूमिका घेण्याचे संकेत प्राप्त होत आहेत.

आपण हिंदुत्वाची भूमिका का घेत आहोत, याची मीमांसा राज ठाकरे मेळाव्यात करणार आहेत. मागील गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज यांनी ‘लाव रे तो व्डिडीओ’ अशी आरोळी ठोकत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले होते. आता येत्या महापालिका निवडणुकांवर लक्ष केंद्रित करून राज ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडतील.

महापालिकेतील भ्रष्टाचार व नागरी समस्या यावरून राज ठाकरे हे सरकारला लक्ष्य करतील. त्याच वेळी ईडीच्या कारवायांवरही भाष्य करणार आहेत. यापूर्वी कोहिनूर मिलच्या खरेदीबाबत राज ठाकरे यांनाही ईडीने नोटीस पाठवून चौकशीला बोलावले होते. त्यामुळे राज ठाकरे हे ईडी व केंद्र सरकारवर तोंडसुख घेणार की, ईडीच्या सेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सुरू असलेल्या कारवायांचे समर्थन करणार याबाबत उत्सुकता आहे.

शिवसेनेच्या झालेल्या कोंडीचा लाभ उठवणार

महापालिका निवडणुकीत लढत मुख्यत्वे शिवसेना विरुद्ध भाजप अशी आहे. मात्र मनसेला आपली स्पेस निर्माण करावी लागणार आहे. सत्तेमुळे कठोर भूमिका घेताना शिवसेनेच्या झालेल्या कोंडीचा लाभ उठवण्याचा प्रयत्न राज ठाकरे करणार आहेत.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMNS Gudi Padwa Rallyमनसे गुढीपाडवा मेळावाAyodhyaअयोध्या