शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडली; AIIMS रुग्णालयात केले दाखल
2
“निरोप द्यायला सभागृहात यायला हवे ना, फेसबुक लाइव्ह करुन...”; शिंदेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर
3
“सर्वांत जास्त पेपरफूट ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये भीषण चकमक; 3 पाकिस्तानी दहशतवाद्यी ठार
5
“मी तुमचाच, विरोधी पक्षनेते हे केवळ पद नाही तर...”; राहुल गांधींची प्रतिक्रिया, दिली गॅरंटी
6
पाकिस्तानच्या आरोपांपासून ते ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर होण्याच्या प्रश्नावर Rohit Sharmaची भन्नाट बॅटिंग
7
सेमी फायनलपूर्वी राशिद खानवर ICC ची कारवाई; बांगलादेशविरुद्धच्या लढतीतील चूक भोवली
8
काँग्रेस नेते सॅम पित्रोदा परतले; पुन्हा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड
9
"ब्रँड हा ब्रँड असतो! राष्ट्रवादी या ब्रँडला कॉपी करण्याची..."; शरद पवार गटाने सुनिल तटकरेंना डिवचलं
10
मोठी बातमी : भारतीय संघात अचानक करावा लागला बदल, शिवम दुबे... 
11
'बैलगाडीतून जाईन पण Air India मध्ये पुन्हा बसणार नाही', प्रवाशाचा संताप; नेमकं काय झालं?
12
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? नवनीत राणांनी सविस्तर सांगितले
13
“महाघोटाळेबाज सरकारचा चहा घेणे जनतेचा अपमान, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या”: विजय वडेट्टीवार
14
“महायुती पक्की, राज्यात पुन्हा डबन इंजिनचे सरकार येईल”; चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास
15
₹23 रुपयांचा शेअर सुटलाय सुसाट, आली 'तुफान' तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुबंड, 220% नं वधारला
16
“विधानसभेला महायुतीत अजितदादांच्या वाट्याला २० ते २२ जागा येतील”; रोहित पवारांचा टोला
17
"तुरुंगातून बाहेर येऊ नये यासाठी संपूर्ण यंत्रणा प्रयत्नात"; सीएम केजरीवाल यांच्या अटकेवर पत्नी सुनीता केजरीवाल म्हणाल्या,...
18
ईव्ही क्षेत्रातली बडी कंपनी महाराष्ट्रात येणार; 4000 लोकांना रोजगार मिळणार; फडणवीसांची घोषणा
19
विरोधी पक्षनेते झालेले किती नेते पुढे पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले? पाहा...
20
गळाभेट, हातात-हात अन्...; संसद भवनात दिसली चिराग-कंगनाची जबरदस्त केमिस्ट्री! बघा VIDEO

गोविंदा पथकांचा विमा महापालिकांनी उतरवावा; मनसेच्या अविनाश जाधवांची मागणी

By अजित मांडके | Published: August 03, 2022 5:53 PM

ठाणे महानगरपालिका आयुक्तांकडे अविनाश जाधव यांनी दिलं मागणीचं पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: वसई-विरार महापालिकेने त्यांच्या हद्दीतील गोविंदा पथकांचा अपघात विमा उतरवला आहे. त्या धर्तीवर, ठाणे महापालिकनेही शहरातील गोविंदा पथकाचा अपघात विमा उतरवावा. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे - पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणे मनपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, मुंबई,नवी मुंबई महापालिकासोबत राज्यातील सर्व बड्या महापालिकानी पुढाकार घेऊन अशा प्रकारे गोविंदा प  थकांचा विमा उतरवावा असेही त्यांनी सांगितले.

कोरोना काळात दोन वर्ष गणेशोत्सव आणि दहीहंडी सारख्या सार्वजनिक सणांवर आलेल्या निर्बंधामुळे मराठी मनावर मरगळ आली होती. परंतु यावर्षी मात्र सर्व सण जोषात साजरा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याने गणेश भक्त आणि गोविंदांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या अनुषंगाने यंदा दहीहंडी उत्सवाकरीता वसई विरार महापालिकेने घेतलेल्या एका निर्णयाने गोविंदा सुखावले आहेत. वसई विरार महापालिकेने आपल्या मनपा क्षेत्रातील सर्व गोविंदांचा अपघाती विमा उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्यात देखील अनेक गोविंदा पथके आहेत, याच धर्तीवर ठाणे महापालिकेने एक पाऊल पुढे टाकत गोविंदा पथकातील बाळगोपाळांचे विमा उतरवावेत, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

किंबहुना, वसई विरारच का, ठाणे, मुंबई, नवी मुंबईसह महाराष्ट्रातील सर्वच महापालिकानी गोविंदाचे विमे उतरविले पाहिजेत. अशी मागणी त्यांनी केली. या आधी जायबंदी झालेल्या गोविंदाच्या औषधोपचाराचा सर्व खर्च शासनाने करावा अशी मागणी देखील त्यांनी केली. दही हंडी हा सण आता महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नसून त्याला आंतरराष्ट्रीय महत्व प्राप्त झाले असल्याने पालिका प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकत या सणात खारीचा वाटा उचलावे असेही ते म्हणाले.

वसई विरार महापालिकेने गोपाळकाला अपघात विमा योजनेस १ ऑगस्ट रोजी मंजुरी दिली आहे. यासाठी मंडळांनी आपल्या नोंदणीकृत मंडळाच्या पत्रावर गोविंदाचा पूर्ण तपशील व आधार कार्डची छायाकित प्रत जोडावी. या योजनेत १२ वर्षाखालील गोविंदांचा विमा काढला जाणार नसुन नोंदणीसाठी १६ ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

टॅग्स :Dhahi HandiदहीहंडीAvinash Jadhavअविनाश जाधवMNSमनसेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका