शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

'वीज कापायला आलात तर मनसे स्टाइल शॉक देऊ'

By मोरेश्वर येरम | Published: November 18, 2020 2:09 PM

ऊर्जामंत्र्यांनी वीजबिल माफ होणार नाही असं जाहीर केलं. जर लोकांकडून बळजबरीनं वीजबिल घेतलं जाणार असेल तर तुमची गाठ मनसेशी आहे हे लक्षात ठेवा', असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे. 

ठळक मुद्देवीजबिलाच्या संदर्भात मनसेची आक्रमक भूमिकावीजबिल भरण्यासाठी बळजबरी केल्यास गाठ मनसेशी, अविनाश जाधव यांचा इशाराराजू शेट्टी यांनीही वीजबिलाच्या मुद्द्यावरुन सरकारला खडसावलं

ठाणेवाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावर मनसेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. वीजबिलच्या प्रश्नावर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यात वीजबिल न भरल्याने वीज कापायला येणाऱ्या अधिकाऱ्यांना मनसे स्टाइलनं शॉक देऊ, असा इशाराच मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. 

'लॉकडाउनदरम्यान जनतेला आलेलं वाढीव वीजबिल माफ व्हावं यासाठी आम्ही अनेक आंदोलनं केली. काहीवेळा आमच्या कार्यकर्त्यांनी कायदाही हातात घेतला. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनाही याबाबत पत्र लिहीलं. पण त्यावर अद्याप काहीच तोडगा निघालेला नाही. ऊर्जामंत्र्यांनी वीजबिल माफ होणार नाही असं जाहीर केलं. जर लोकांकडून बळजबरीनं वीजबिल घेतलं जाणार असेल तर तुमची गाठ मनसेशी आहे हे लक्षात ठेवा', असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे. 

 

लोकांनी वीज वापरली असेल तर बिल भरावंच लागेल, वीजबिलात कुठलीही माफी अथवा सवलत नाही, असं विधान ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं होतं. त्यानंतर वीजबिलाच्या मुद्द्यावरुन रान उठलं आहे. मनसेसोबतच स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही सरकारला इशारा दिला आहे. 'आम्ही वीजबिल भरणार नाही, सक्तीची वसुली करून बघा, जशास तसं उत्तर देऊ', अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे. 

मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही नितीन राऊत यांच्या भूमिकेवर 'अजब सरकारचा गजब यू टर्न', असं ट्विट करत टीका केली आहे. तर ठाणे-पालघर जिल्ह्यात कोणताही अधिकारी बळजबरीने वीजबिल घेण्यासाठी अथवा मीटर कापण्यासाठी आला तर मनसेचे कार्यकर्ते कायदा हातात घेतील आणि याची पूर्ण जबाबदारी एमएसइबीच्या अधिकाऱ्यांची असेल, असा इशारा मनसे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांनी दिला आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेelectricityवीजAvinash Jadhavअविनाश जाधवMumbaiमुंबई