शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

मनसेच्या सदस्यांचा सभेवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 1:16 AM

केडीएमसीने स्मार्ट सिटी, अमृत योजनांसाठी महापालिकेच्या हिश्श्याची रक्कम अर्थसंकल्पात राखून ठेवली आहे.

कल्याण : केडीएमसीने स्मार्ट सिटी, अमृत योजनांसाठी महापालिकेच्या हिश्श्याची रक्कम अर्थसंकल्पात राखून ठेवली आहे. परंतु, प्रकल्प राबवण्यास व त्यासाठी रक्कम राखून ठेवण्यास मनसेचा विरोध नाही. मात्र, सदस्यांच्या प्रभागांतील विकासकामांना महापालिका आयुक्त गोविंद बोडके हे कात्री लावतात. त्यांच्या या कृतीच्या निषेधार्थ मनसेच्या सदस्यांनी गुरुवारी झालेल्या तहकूब सभेनंतरच्या सभेवर बहिष्कार टाकला.मनसेचे विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर म्हणाले की, महापालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी ५० टक्के सहभागाची रक्कम अर्थसंकल्पात राखून ठेवली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम २०१६ पासून सुरू आहे. परंतु, एकही काम प्रत्यक्षात आलेले नाही. त्याचबरोबर अमृत योजनेंतर्गत २७ गावांच्या पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी घाईगर्दीत पार पडला. या योजनेसाठीही आपल्या हिश्श्याची रक्कम महापालिकेने राखून ठेवली आहे. दुसरीकडे सदस्यांच्या प्रभागात पायवाटा, गटारे, यासारखी कामे करण्यासाठी महापालिकेच्या खात्यात निधी नसल्याचे कारण सांगून आयुक्त सदस्यांच्या विकासकामांच्या फाइल रोखून ठरतात. त्यावर चर्चा करू, असा शेरा मारतात. ही नाराजी केवळ मनसे सदस्यांची नाही. सर्व पक्षांच्या सदस्यांचा हा रोष प्रशासनाविरोधात आहे. सत्ताधारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप भोईर यांनी केला आहे.दरम्यान, केंद्र सरकारच्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पबाधितांना बीएसयूपी योजनेतील ८४० घरे देण्याचा प्रस्ताव २० आॅगस्टच्या महासभेत स्थगित ठेवण्यात आला होता. महापालिकेने बीएसयूपी योजनेतील घरे शहरातील गरिबांसाठी उभारली होती. मात्र, त्यापैकी तीन हजार घरे ही पंतप्रधान आवास योजनेत रूपांतरित केली गेली. महापालिकेच्या प्रकल्पबाधितांना व ज्यांच्यासाठी घरे उभारली त्यांना न देता, ही घरे रेल्वेच्या प्रकल्पबाधितांना देण्यास सदस्यांनी हरकत घेतली होती. हा विषय पुन्हा गुरुवारच्या सभेत घेतला गेला. त्याला पुन्हा शिवसेना सदस्य सचिन बासरे यांनी हरकत घेतली. महापालिकेतील प्रकल्पबाधित व बीएसयूपी लाभार्थ्यांचा विषय प्रथम मार्गी लागल्यावरच रेल्वे प्रकल्पबाधितांच्या घरांचा विषय घ्यावा, असे २० आॅगस्टच्या महासभेत ठरले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.याच विषयाला अनुसरून शिवसेना सदस्या प्रियंका भोईर यांनी कल्याण पश्चिमेतील इंदिरानगरातील बीएसयूपी लाभार्थ्यांना अद्याप घरे मिळाली नसल्याचा मुद्दा मांडला. त्याचबरोबर सदस्या शकिला खान म्हणाल्या की, महापालिकेने गोविंदवाडी बायपास रस्त्यातील प्रकल्पबाधितांना बीएसयूपी प्रकल्पात घरे देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांना अद्याप घरे मिळालेली नाहीत. त्यामुळे हा विषय स्थगित ठेवावा, याकडे पुन्हा सदस्यांनी लक्ष वेधले. रेल्वे प्रकल्पबाधितांसाठी प्रकाश भोईर, गावदेवी संघर्ष समिती आणि सूर्या सेवा संस्थेने पाठपुरावा केला होता. रेल्वेने घराच्या बदल्यात घर देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार, रेल्वेकडून हा प्रस्ताव आला आहे. हा प्रस्ताव एका सदस्याचा नाही. त्यामुळे हा विषय स्थगित ठेवू नये. मार्गी लावावा, अशी मागणी भोईर यांनी केली.‘त्या’ अधिकाऱ्यांची चौकशीबीओटी प्रकल्पातील अनियमिततेप्रकरणी दोषी असलेल्या अधिकाऱ्यांविरोधात विभागीय चौकशीचा प्रस्ताव प्रशासनाकडून महासभेत मांडला गेला होता. मात्र, हा प्रस्ताव पुन्हा परत पाठविला गेला आहे.बीओटी प्रकल्पाच्या निविदा ज्यावेळी काढल्या गेल्या, त्यावेळी कार्यरत असलेल्या अधिकाºयांची चौकशी करावी. जे अधिकारी त्यावेळी कार्यरत नव्हते, मात्र सध्य बीओटी प्रकल्पाचा ज्यांच्याकडे कार्यभार आहे, अशांना या चौकशीतून वगळावे, असा निर्णयही महासभेत घेतला गेला. त्यामुळे विद्यमान अधिकाºयांना चौकशीच्या फेºयातून वगळण्यात आले आहे.विभागीय चौकशीस दिली मंजुरीस्कायवॉकवरील जाहिरातीचे कंत्राट संपुष्टात आले आहे. कंत्राटदाराला मुदतवाढ दिलेली नसतानाही त्याने परस्पर जाहिरातीचे शुल्क वसूल करून महापालिकेचे नुकसान केले आहे. याप्रकरणी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजय घरत, उपायुक्त सुरेश पवार, मालमत्ता व्यवस्थापक प्रकाश ढोले, अनिल लाड यांच्याविरोधात विभागीय चौकशी करण्यास महासभेने मंजुरी दिली आहे.