शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

धूळ खात पडणारा स्कायवॉक नको; पार्किंग प्लाझा उभारा, सिंघानिया शाळेसमोर पादचारी पुलाला मनसेचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 6:06 PM

ठाणे शहरातील इतर स्कायवॉकप्रमाणे हा स्कायवॉक धुळखात पडण्यापेक्षा त्या ठिकाणी वाहनतळ उभारल्यास सिंघानिया शाळेबाहेरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. यासोबतच ठाणेकरांचा कररूपी पैसादेखील वाचेल, असा पर्यायदेखील मनसेने सुचवला आहे. (Thane Municipal Corporation)

ठाणे- कोरोना काळात पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना कोट्यवधी रुपये खर्चून समतानगर ते सिंघानिया शाळा, असा अनावश्यक स्कायवॉक उभारण्यापेक्षा रेमंड कंपनीच्या सुविधा भूखंडावर वाहनतळ उभारण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. 

ठाणे शहरातील इतर स्कायवॉकप्रमाणे हा स्कायवॉक धुळखात पडण्यापेक्षा त्या ठिकाणी वाहनतळ उभारल्यास सिंघानिया शाळेबाहेरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. यासोबतच ठाणेकरांचा कररूपी पैसादेखील वाचेल, असा पर्यायदेखील मनसेने सुचवला आहे. 

ठाण्यातील समतानगर ते सिंघानिया शाळा, अशा बांधण्यात येणाऱ्या पादचारी पूलाचे नुकतेच भूमीपूजन करण्यात आले. ३ कोटी ७० लाख रुपये खर्चून पालिका प्रशासन या ठिकाणी स्कायवॉक उभारणार आहे. मात्र या भागात महत्त्वाची समस्या रस्ता ओलांडणे नसून शाळेबाहेरील पार्किंगमुळे होणारी वाहतूककोंडी ही आहे. रस्त्याच्या एका बाजूला सिंघानिया शाळा तर समोरील बाजूला सत्कार हॉटेल, दफन भूमी असल्याने येथे येणाऱ्या नागरिकांना स्कायवॉकचा उपयोग शून्य आहे. तर सिंघानिया शाळेत शिकणारे विद्यार्थी संपूर्ण ठाणे शहरातून येतात. त्यातील बहुतांश पालक स्वत:ची गाडी घेऊन येतात. त्यांना रस्ता ओलांडण्यासाठी पुलाची गरज नाही. तर शालेय विद्यार्थी व पालकांची गैरसोय टाळण्यासाठी रेमंड येथील ३१३१३ चौरस मीटर सुविधा भूखंड विकसीत करून पार्कींगची सोय करावी. जेणेकरून विद्यार्थी व पालकांना रस्ता ओलांडायची वेळच येणार नाही, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी महापौरांना निवेदनाद्वारे केली आहे.

विकासकामार्फत पार्किंग प्लाझा उभारा -रेमंडच्या सुविधा भूखंडावर विकासकामार्फत पार्किंग प्लाझा उभारल्यास ठाणेकरांचे पैसे वाचतील. शहरात असे बरेच प्रकल्प विकासकांमार्फत बांधून घेऊन त्याबदल्यात त्यांना अतिरिक्त एफएसआय देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोना काळात महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना अतिरिक्त पैसा खर्च होणार नाही, अशी मागणी मनविसे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केली आहे. तसेच कॅडबरी जंक्शन येथे मुंबईला जाण्यासाठी बसेस थांबतात तेथे प्रवाशांची रस्ता ओलांडताना गैरसोय होते त्याकरिता सबवे (भुयारी मार्ग) बांधण्यात यावा, असेही पाचंगे यांनी निवेदनात नमूद केले आहे. 

'या' स्कायवॉकना वाली नाही!ठाण्यात तीनहात नाका येथील रहेजा गृहसंकुल तसेच जुन्या पासपोर्ट कार्यालयानजीक काही वर्षांपूर्वी ठाणे पालिका प्रशासनाने स्कायवॉक उभारले आहेत. हे दोन्ही स्कायवॉक सद्यस्थितीत धूळखात पडले असून त्यांचा वापर होत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा नवीन स्कायवॉक गरज नसताना ते ठाणेकरांच्या माथी मारण्यापेक्षा या पैशांचा योग्य प्रकल्पात विनियोग करावा, असे संदीप पाचंगे यांनी सांगितले.

आम्ही मनसेचे ऐकायचे का? हा विषय पावणे दोन वर्षांपूर्वीचा आहे तेव्हा मंजूर करण्यात आला होता. विरोध करायचा होता तर तेव्हा करायला हवा होता. या कामाचे टेंडरदेखील निघाले. कोरोनामुळे काम थांबले होते. सिघानिया शाळेचे पालक, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक यांची ही मागणी होती. त्यांच्या मागणीवरून पादचारी पूल उभारला जात आहे. मनसेने ही मागणी तेथील स्थानिक नगरसेवकाकडे करावी, असे महापौर नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणेMNSमनसे