उल्हासनगर: नेताजी चौकातील न्यू इंग्लिश शाळेच्या फी वाढीच्या निषेधार्थ मनसेने धडक आंदोलन केले. दरम्यान फी वाढीची दखल आमदार गणपत गायकवाड यांनी घेऊन शाळा प्रशासनाची भेट घेतली होती. उल्हासनगर कॅम्प नं-५, नेताजी चौकातील न्यु इंग्लिश शाळेने पालकांना विचारात न घेता फी वाढ केल्याने, पालकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर मनसेच्या पदाधिकार्यांनी व स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी शाळा प्रशासनाची भेट घेऊन फी वाढ मागे घेण्याची विनंती करण्यात आली. दरम्यान फी वाढ कमी केली नसल्याच्या निषेधार्थ मनसे विध्यार्थी सेनेचे वैभव कुलकर्णी यांच्यासह पक्षाच्या शिष्टमंडळाने शुक्रवार न्यू इंग्लिश शाळेवर धडक दिली. तसेच वैभव कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली फी वाढ विरोधात पालकांची स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली आहे.
मनसेच्या स्वाक्षरी मोहिमेत पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जवळपास १०५० फॉर्मचे वाटप पैकी ९५० पालकांनी फॉर्म जमा करत आपला विरोध फी वाढी विरोधात नोंदवला आहे. यावेळी पक्षाचे शैलेश पांडव, स्वप्नील त्रिभुवन, अशोक गरड, प्रमोद पालकर, सान्नी खिल्लानी, अजय बागुल, वैभव शिंदे, विजय पवार, अक्षय साळवी, भावेश चौधरी आदी जण उपस्थित होते.