शहरं
Join us  
Trending Stories
1
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
4
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
5
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
6
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
7
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
8
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
9
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
10
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
11
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
12
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
13
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
14
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
15
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
16
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
17
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
18
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
19
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
20
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी

ठाणे शहरातील ५०० खड्ड्यांचे फोटो मनसेच्या वतीने नगरअभियंतांना सादर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 7:47 PM

खड्डे बुजविण्याचे साडेतीन कोटीचे टेंडर मार्चला निघूनही पाच महिने कागदावरच

ठाणे: ठाणे शहरातील खराब रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी ठाणे महापालिकेने पाच महिन्यापूर्वीच साडेतीन कोटींची निविदा काढली होती. पण महापालिकेचे काम आणि सहा महिने थांब या उक्तीप्रमाणेचे गेल्या सहा महिन्यात शहरातील खड्डे बुजविण्याचे काम केले गेलेच नाही. त्यामुळे मनसेच्या वतीने शहरातील ५०० खड्ड्यांचे फोटो नगर अभियतांना सादर करत, ठाणेकरांना होणाऱ्या खड्डयांच्या समस्यांचा पाढा वाचला.

ठाणे शहरातील उड्डाणपुल, रस्त्यावर आणि सेवा रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्ष्ररश: चाळण झाली आहे. रस्त्यांवर वाहनांची वाढत असलेली संख्या, मेट्रोचे सुरू असलेले काम आणि या मार्गवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यामुळे ठाणेकरांना सध्या खराब रस्ते आणि वाहतूककोंडी असा दुहेरी समस्यांचा सामाना करावा लागत आहे.

शहरातील मीनाताई ठाकरे चौक, वंदना सिनेमागृह आणि नौपाडा परिसरातील असे तीन उड्डाणपुला बरोबरच माजीवाडा ते आनंदनगर या घोडबंदर मार्गासह ठाण्यातील पूर्वद्रूतगती महामार्गसह मुंबई नाशिक महामार्गावर तसेच हावरे सिटी, वर्तक नगर, वागळे इस्टेट, कासेल मिल, गोकुळ नगर, वृंदावन सोसायटी, लोकमान्य नगर पडलेल्या खड्ड्यांमुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत भर पडत आहे. दरवर्षी ठाणेकरांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या पाच महिन्यांपासून रखडलेल्या कामांना गतीही दिली जात नसल्याचे वास्तव आहे. अखेर मनसेचे स्वप्निल महिंद्रकर यांनी नगरअभियंता रविंद्र खडते यांना शहरातील ५०० खड्ड्यांचे फोटो देत याचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी मनसेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी केली.पेव्हर ब्लॉक बसवित न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन- 

या मार्गावरील उड्डाणपुलावर तसेच मुख्य रस्त्यावर खड्डे बुजविण्यासाठी पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे उच्च् न्यायालयाने पेव्हर ब्लॉक बसविण्यास बंदी केली असतानाही महापालिका या आदेशाची पायमल्ली करत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय या पेव्हर ब्लॉकमुळे रस्त्यावर पुन्हा गॅप निर्माण होऊन अपघाताला निमंत्रण दिले जात आहे.

टॅग्स :MNSमनसेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाroad transportरस्ते वाहतूक