ठाणे : ‘ईव्हीएम मशीन बंद झालीच पाहिजे’, ‘बंद करा बंद करा ईव्हीएम मशीन बंद करा’, ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ अशा घोषणा देऊन गुरुवारी शासकीय विश्रामगृहाजवळ मनसेने ईव्हीएम मशीनचा जाहीर निषेध केला.यावेळी ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे हे लोकमान्य टिळक यांची वेशभूषा परिधान करून सहभागी झाले होते. ‘पारदर्शक मतदान हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ असा इशाराही यावेळी पक्षाने दिला.
लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून मनसेने ईव्हीएम मशीनवर बंदी घालण्याची मागणी करण्यासाठी मोरे यांच्या नेतृत्वाखाली विरोध दर्शवला. पारदर्शकतेचा डंका पिटणाºया सत्ताधाऱ्यांनी लोकभावनेचा आदर करून मतदान प्रक्रि या नि:संशय आणि पारदर्शक करावी, अन्यथा हे आंदोलन उत्तरोत्तर आणखी तीव्र करण्यात येईल, याची सरकारने नोंद घ्यावी, असे पक्षातर्फे सांगण्यात आले.यावेळी पक्षाच्या पदाधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांना ईव्हीएमऐवजी बॅलेटपेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात, या मागणीचे निवेदन दिले.या आंदोलनात मनविसे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे, सचिव नैनेश पाटणकर, सुशांत डोंबे, अनिल म्हात्रे, सुशांत सूर्यराव, आशीष डोके, महेश साळवी, सुबोध वैद्य व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.