शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

ठाण्यातील वाचनालय, पाणपोईच्या दुरावस्थेकडे मनसेने वेधले लक्ष, दुरूस्त होईपर्यंत पत्रव्यवहार चालूच राहणार - मनसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 3:50 PM

दुरावस्थेत असलेले वाचनालय व पाणपोई लवकरात लवकर दुरुस्त करून नागरिकांसाठी उपलबद्ध करून देण्याची मागणी मनसेने केली आहे.

ठळक मुद्दे दुरावस्थेच्या विळख्यात पाणपोई, वाचनालयजोपर्यंत दुरूस्ती होत नाही तोपर्यंत पत्रव्यवहार करीत राहणार - मनसेमहापालिकेला दिले निवेदन

ठाणे: मनोरमा नगर येथील गेल्या काही वर्षांपासून दुरावस्थेच्या विळख्यात सापडलेल्या पाणपोई, वाचनालयाकडे मनसेने लक्ष वेधले आहे. पाणपोई, वाचनालयाच्या दुरावस्थेकडे महापालिकेबरोबर लोकप्रतिनिधीही दुर्लक्ष करीत असून जोपर्यंत दुरूस्ती होत नाही तोपर्यंत पत्रव्यवहार करीत राहणार असा इशाराही मनसेने दिला आहे.       मनोरमा नगर येथील शंकर मंदिराच्या बाजूला असलेल्या पाणपोई, वाचनालय गेल्या काही वर्षांपासून दुरावस्थेत पडले आहे. वाटसरुंची तहान भागावी म्हणून पाणपोई तर परिसरातील नागरिकांना वृत्तपत्र वाचायला मिळावीत यासाठी वाचनालय उभारण्यात आले होते. परंतू या वास्तूची ना महापालिकेकडून , ना लोकप्रतिनिधींकडून दखल घेतली जात आहे असा आरोप मनविसेचे विभाग अध्यक्ष प्रमोद पत्ताडे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी माजीवाडा - मानपाडा प्रभाग समितीला निवेदन दिले आहे. एखादी वास्तू प्रभागात उभारली की त्याकडे कोणाचेही लक्ष नसते, नागरिकांना मोफत वाचनालय, पाणपोई अशा सुविधा देऊन त्याची डागडुजी करीत नसाल तर त्याचा काहीही उपयोग नाही. हळूहळू या वास्तू दुरावस्थेच्या विळख्यात सापडत जातात आणि नंतर त्या ठिकाणी कचºयाचे साम्राज्य उभे राहते व पार्किंग झोन निर्माण होतो असे पत्ताडे यांनी महापालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. महापालिकेच्या निधीचा गैरवापर होत असून पाणपोई आणि वाचनालयाचा नागरिकांना उपभोग घेता यावा यासाठी ते तातडीने दुरूस्त करुन नागरिकांसाठी उपलब्ध करावे अशी मागणी या निवेदनात मनसेने केली आहे. परंतू निवेदन दिल्यानंतर डागडुजी झाली नाही तर जोपर्यंत या वास्तू दुरूस्त होत नाही तोपर्यंत मनसेचा पत्र्यववहार सुरूच राहील असे पत्ताडे यांनी सांगितले आहे.

टॅग्स :thaneठाणेMNSमनसेtmcठाणे महापालिका