ठाणे : कोरोनामुळे हातावरचे पोट असणाऱ्यांचे प्रंचड प्रमाणात नुकसान झाले आहे, कोणाची नोकरी गेली तर कोणाच्या हाती रोजीरोटी नाही. त्यामुळे अशा गरजु आणि गोरगरीब नागरीकांसाठी ठाणे शहर मनसे धावून आली आहे. त्यानुसार रिक्षा चालक, रिक्षा चालक महिला, घरकाम करणाऱ्या महिला, तृतीय पंथी आदींसह झोपडपटटी भागात वास्तव्यास असलेल्या नागरीकांसाठी मागील १३ मे पासून मनसेचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या वतीने मोफत अन्न धान्याचे किट वापट केले जात आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचे संसार उघडय़ावर पडले आहेत. खास करुन रिक्षा चालक, नोकरदार वर्ग, घरकाम करणा:या महिलांसह झोपडपट्टी भागातील नागरीकांना किराणा सामान घेण्यासही हाती पैसा नाही. अशा नागरीकांसाठी १३ मे पासून मनसेच्या वतीने मोफत अन्नधान्य वाटप योजना हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत समाजातील ६ गटातील नागरीकांना अन्नधान्याचा मदतीचा हात देण्यात आला आहे.
यामध्ये रिक्षा चालक, घरकाम, चित्रपट काम करणारे बॅक स्टेज कलाकार, महिला रिक्ष चालक, तृतीय पंथ आणि झोपडपटटीत वास्तव्यास असलेल्या सुमारे २ हजार नागरीकांना आतार्पयत अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये तीन ते पाच किलो तांदूळ, तीन किलो गहू किंवा पीठ, अर्धा अर्धा किलो कडधान्य, डाळी, एक किलो साखर, मसाल्याची पाकीटे, चहा पावडर, एक एक किलो कांदे बटाटे, मीठ, तेल आदी साहित्य दिले गेले आहे.