भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने काशिमीरा येथील काँक्रीटीकरण पाच महिन्यांपासून कासवगतीने सुरु आहे. त्याचा त्रास नागरिकांसह वाहतुकीला होत असल्याची बाब ‘लोकमत’ने शनिवारच्या ‘हॅलो ठाणे’ मध्ये उघड केली. याची दखल घेत सोमवारी पालिका मुख्यालयात आंदोलनाचा इशारा शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी दिला आहे. पालिकेने डांबरीकरणाऐवजी काँक्रीटीकरणाचा निर्णय घेतला. मात्र पालिकेने सरकारच्या आदेशानुसार काँक्रीटीकरणाचे काम शहरातील विकासकांकडून करुन घेण्याचा निर्णय घेतला. त्याच्या मोबदल्यात विकासकांना टीडीआर देण्याचा फंडा अंमलात आणण्यास सुरुवात केली. त्यानुसार येथील रवी ग्रूपला टीडीआरच्या मोबदल्यात हाटकेश येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सोपविले. हे काम अंतिम टप्प्यात असताना विकासकाने पालिकेकडून अद्याप टीडीआर मिळाला नसल्याने काम बंद पाडले. यात काही तांत्रिक व राजकीय अडचणी असल्याचे सांगण्यात येत असले तरी पालिकेचा टीडीआर फंडा मात्र कुचकामी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पालिकेने गोल्डन नेस्ट पोलीस चौकी मागील इंद्रलोककडे जाणाऱ्या रस्त्यासह काशिमिरा येथून शहरात येणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण विकासकांच्या सहकार्याने न करता स्वत:च्या खर्चातून करण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही कामांसाठी सुमारे १२ कोटींहून अधिक खर्च होणार आहे. पालिकेने तूर्तास सुमारे अडीच कोटीच्या निविदा काढल्या आहेत. काशिमीरा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील काँक्रीटीकरणाचे काम पाच महिन्यांपासून सुरु आहे. (प्रतिनिधी)कामाची मुदत संपलीयाबाबत प्रसाद सुर्वे म्हणाले, काँक्रीटीकरणामुळे वाहतूक कोंडी होते. नागरिकांना चालता येत नाही. रस्त्याच्या खोदकामामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला धोका उद्भवण्याची शक्यता आहे. त्यासाठी पालिकेने कोणतीही खबरदारी व नियोजन केलेले नाही. कामाची मुदत संपल्यानंतरही काम धीम्या गतीने सुरुच आहे. त्याचाच जाब प्रशासनाला विचारण्यात येणार आहे.
रस्त्यासाठी मनसेचे उद्या आंदोलन
By admin | Published: February 26, 2017 2:42 AM