कल्याण : डोंबिवली एमआयडीसीतील शिवाई बालकमंदिर शाळेसमोरील मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे आंदोलन मनसेने गुरुवारी केले. यावेळी श्रमदानातून व स्वखर्चाने खड्डे बुजविण्यात आले.
मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत, जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, प्रकाश माने, सरोज भोईर, दीपिका पेडणेकर, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.
एमआयडीसीतील रस्त्यांना पावसामुळे खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी त्यात साचून रस्ता चिखलमय झाला आहे. या रस्त्यावर वाहनचालकांना वाहने नेताना कसरत करावी लागते. वाहने सावकाश चालवूनही अपघात होण्याची शक्यता आहे. दुचाकीचालकांचा अपघात होऊ शकतो. हे रस्ते एमआयडीसी हद्दीतील असून, कारखानदार कोट्यवधी रुपयांचा कर महापालिकेस भरतात. तरीही एमआयडीसी आणि महापालिका एमआयडीसी परिसरातील नागरिकांना सोयीसुविधा पुरवीत नाही. सरकारने रस्ते विकासासाठी निधी मंजूर केला असला तरी रस्ते विकासाला कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत होता, असे मनसेकडून सांगण्यात आले.
------------------