शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

मोबाइल जबरीने चोरणाऱ्यास ठाण्यातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 12:26 AM

मोबाइल जबरदस्तीने खेचून पलायन करणा-या संजय गुरुनाथ जाधव (२६) याला कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याच्या साथीदाराला मात्र २६ आॅक्टोबरपर्यंत अंतरिम जामीन ठाणे न्यायालयने मंजूर केला आहे.

ठळक मुद्देदीड लाखांचे सहा मोबाइल हस्तगतदुसºया आरोपीची जामीनासाठी धाव

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मोबाइल जबरदस्तीने खेचून पलायन करणाºया संजय गुरुनाथ जाधव (२६, रा. भिवंडी, ठाणे) याला कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून एक लाख ५२ हजार ९०० रुपयांचे सहा मोबाइल हस्तगत केले असून त्याच्या साथीदाराला मात्र २६ आॅक्टोबरपर्यंत अंतरिम जामीन ठाणे न्यायालयने मंजूर केला आहे.माजीवडा भागातील रहिवाशी मणिलाल मुकूंद गडा हे १६ नोव्हेंबर २०१९ रोजी माजीवडा रिक्षा स्टॅन्डजवळ उभे असतांना त्यांच्या हातातील मोबाइल मोटारसायकलीवरुन आलेल्या दोघांनी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास हिसकावून पलायन केले होते. याप्रकरणी १७ नोव्हेंबर रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तब्बल वर्षभर याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, निरीक्षक संजय पाटील आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सिताराम बुधर यांनी तपास केला. वर्षभराने म्हणजे १८ सप्टेंबर २०२० रोजी या मोबाईलचे लोकेशन पोलिसांना स्ट्रेसआऊट झाले. त्याआधारे २० सप्टेंबर रोजी संजय जाधव याला भिवंडीतून या पथकाने अटक केली. त्याला २६ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. त्यानंतर १० आॅक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. त्याच्याकडून या ५५ हजार ९०० रुपयांच्या मोबाइलसह अन्य पाच असे एक लाख ५२ हजार ९०० रुपयांचे सहा मोबाइल हस्तगत करण्यात आले. या पाचमध्ये एक माजीवडा भागातून गहाळ झालेला मोबाइलही त्याच्याकडे मिळाला. चौकशीत मोहंमद राहील या त्याच्या साथीदाचे नावही उघड झाले. त्याला हे पथक ताब्यात घेण्यासाठी गेले तेंव्हा अटकपूर्व जामीनासाठी त्याने ठाणे न्यायालयात धाव घेतली. त्याला २० आॅक्टोबर २०२० रोजी न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला असून त्याच्या जामीन अर्जावर २६ आॅक्टोबर रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्याकडून आणखीही अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक