शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

प्रतिबंधित क्षेत्रात फिरती विसर्जनव्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 12:41 AM

या ठिकाणी विसर्जनासाठी महापालिकेतर्फे स्वयंसेवक नेमण्यात येणार आहेत. निर्माल्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.

ठाणे : शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना गणेश विसर्जनासाठी बाहेर पडण्याची मुभा नसल्याने प्रतिबंधित क्षेत्रासाठी फिरती विसर्जनव्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी घेतला आहे. या अभिनव संकल्पनेमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.विसर्जनाच्यावेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी महानगरपालिका विविध उपाययोजना करीत आहे. तथापि, प्रतिबंधित क्षेत्रातील मूर्तींचे विसर्जन घरीच करण्याविषयी शासनाच्या मार्गदर्शक सूचना असल्याने भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी फिरती विसर्जनव्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ट्रॅक्टर अथवा जीपमागे सिंटेक्स टाकीत कृत्रिम विसर्जनव्यवस्था राहणार आहे. या ठिकाणी विसर्जनासाठी महापालिकेतर्फे स्वयंसेवक नेमण्यात येणार आहेत. निर्माल्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.>भाविकांना विसर्जनासाठीची आरती घरीच करावी लागणार असून फिरत्या विसर्जनव्यवस्थेंतर्गत कृत्रिम तलावामध्ये ज्याप्रमाणे विधिवत विसर्जन करण्यात येते, त्याच पद्धतीने श्रींचे विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे.