डोंबिवली : रेल्वे स्थानकातील बाकावर झोपलेल्या अनिल गायकवाड (वय ४१) यांच्या पँटच्या खिशातील मोबाईल शिताफीने काढून पळ काढणाऱ्या सोमनाथ जैस्वाल (२२, रा. कळवा) या चोरास लोहमार्ग पोलिसानी मंगळवारी सायंकाळी रंगेहात पकडले.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार म्हणाले, गायकवाड हे डोंबिवली स्थानकात मंगळवारी फलाट क्रमांक ३ व ४ वर झोपले होते. त्यावेळी जैस्वाल हा त्यांच्या पँटच्या उजव्या खिशातील १० हजार ५०० रुपयांचा मोबाईल फोन काढून रेल्वे रुळातून पळ काढत होता. तेवढ्यात ऑनड्युटी असलेले पोलीस शिपाई आणि होमगार्ड यांनी जैस्वाल याला पकडले. त्याची चौकशी केली असता त्याने मोबाईल चोरल्याचे कबूल केले. त्यामुळे त्याला अटक केली असून, मोबाईल हस्तगत केला आहे. कल्याण रेल्वे न्यायालयाने बुधवारी त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून अन्य गुन्ह्यांची उकल होते का, याचा तपास केला जाणार आहे.
--------------------