उल्हासनगर - शहरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीत आपत्कालीन आतंक आपदा संबधीत थरारक सरावाचे आयोजन करण्यात आले होते. कंपनीच्या सुरक्षा यंत्रणेसह पोलीस, अग्निशमन विभाग, वैधकीय विभाग आपत्कालीन वेळी सतर्क व सक्षम आहे की नाही. हे या सरवातून बघितले जात असल्याची माहिती कंपनीच्या जनसंपर्क अधिकारी मेहुल ललका यांनी दिली.
उल्हासनगर कॅम्प नं-१ येथील शहाड गावठाण परिसरात सेंच्युरी रेयॉन कंपनी आहे. कंपनीत आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास कंपनीच्या सुरक्षा यंत्रणेसह पोलीस, वैधकीय सेवा, अग्निशमन विभाग आदी विभाग सतर्क व सक्षम आहे का? याची पाहणी केली जाते. कंपनीच्या स्टाफ गेट जवळील मैदानात या सरावाला बुधवारी सुरुवात करण्यात आली. सेच्युरी रेयॉन कंपनीत स्पन यार्न, कँटिन्युअस, सूत, टायर कार्ड व काही रसायने प्रक्रियेद्वारे तयार केली जातात. कंपनीच्या काही विशिष्ट ठिकाणी इम्प्रोव्हाईड, एक्सप्लोझिव्ह डीव्हाईस, पेरुन असामाजिक घटकाकडुन गैरप्रकार घडण्याची आणी आसपासच्या परीसरात अशांतता निर्माण करण्याची शक्यता असते. या परीस्थितीवर मात कशी करावी. यासाठी १४ डिसेंबर २०२२ रोजी आपत्कालीन आतंकी आपदा संबधीत सरावाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सेच्युरी रेयॉन कंपनीचे(युनिट हेड)अपुर्व गुप्ता (एच.आर.हेड) श्रीकांत गोरे, (ब्रिगेडीयर)आंनद ठाकुर (कर्नल)सुरेश शिंदे, उल्हासनगर महापालिकेचे उपायुक्त अशोक नाईकवाडे,डॉ.सुभाष जाधव, बाळासाहेब नेटके (मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी), अजित गोवारी, सचिन भेले डेप्युटी डायरेक्टर(डीश)कल्याण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलपगारे, पोलीस निरीक्षक गोडसे यांच्यासह अग्निशमन दल, आपत्ती विभाग, मध्यवर्ती शासकीय रुग्णालयाचे डॉक्टर, फँक्टरी ईनस्पेक्टर आणी (KAMA)चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या प्लाँट मध्ये आपत्कालीन परिस्थितीत सज्जतेचे मूल्यांकन करण्यासाठी आणी कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत आपत कालीन आतंकी आपदा संबधीत सरावाचे आयोजन केले असल्याची माहिती सेच्युरी रेयॉन कंपनीचे (जनसंपर्क अधिकारी) मेहूल लालका यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.