कल्याण : २७ गावांमधील कर्मचाऱ्यांना केडीएमसीच्या सेवेत कायम करा तसेच त्यांना वेतनातील फरक मिळावा या मागणीसाठी अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेतर्फे दोन दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत उपोषण अखेर गुरुवारी मागे घेण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा येऊ घातलेला दौरा पाहता पोलीस प्रशासनाने घेतलेला पुढाकार आणि महापौर विनीता राणे यांनी केलेली मध्यस्थी यात प्रशासनाला नमते घ्यावे लागले आहे. कर्मचाºयांच्या मागण्यांचे प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवून त्यांच्या मान्यतेनंतर कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आले.१ जून २०१५ ला केडीएमसी परिक्षेत्रात २७ गावांचा समावेश करण्यात आला. त्याच दिवशी या २७ गावांमधील ४९८ कर्मचाºयांना महापालिकेत सामावून घेण्यात आले. ५ आॅक्टोबर २०१७ पासून केडीएमसीने या कर्मचाºयांना किमान वेतन लागू केले, मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी जानेवारी २०१८ पासून झाली. १ जून २०१५ ते डिसेंबर २०१७ पर्यंतच्या २९ महिन्यांचा फरक तात्काळ द्यावा, अशी उपोषणकर्त्यांची मागणी होती. यासाठी संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षा डॉ. रेखा बहनवाल मंगळवारपासून बेमुदत उपोषणाला बसल्या होत्या. परंतु, या आंदोलनाची प्रशासनाकडून दखल घेतली न गेल्याने बुधवारी कर्मचारीही काम बंद करीत आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, मागण्यांची दखल न घेतल्यास गुरुवारी महापालिका मुख्यालयात कुटुंबासह घुसून बिºहाड आंदोलन छेडण्यात येईल, जर विरोध झाला तर रस्त्यावरच चुली मांडू असा इशारा कर्मचाºयांनी दिला होता. महत्त्वाचे म्हणजे बुधवारी सायंकाळी कर्मचाºयांनी आक्रमक पवित्रा घेत आयुक्त गोविंद बोडके यांची गाडी अडवली होती. आयुक्तांना निवेदन देत, चर्चेला न बोलावल्याच्या निषेधार्थ त्यांच्या दिशेने बांगड्या भिरकवण्यात आल्या होत्या. आयुक्त मुख्यालयातून घरी परतत असताना हा प्रकार घडला होता. तर दुसरीकडे आंदोलनात सहभागी होणाºया कर्मचाºयांविरोधात कारवाईची तयारी प्रशासनाने केली होती.दरम्यान, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कल्याणमध्ये मेट्रोच्या भूमीपूजन कार्यक्रमासाठी येत आहेत तर दुसरीकडे सुरू असलेल्या उपोषणाकडे महापालिका प्रशासनाने पाठ दाखवल्याने पोलिसांची घालमेल वाढली होती. कर्मचाºयांकडून छेडल्या जाणाºया बिºहाड आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका मुख्यालयाच्या आवारात बंदोबस्ताची जय्यत तयारी केली होती. कर्मचाºयांच्या मागण्यांबाबत प्रशासनाने चर्चा करून उपोषण सोडावे यासाठी पोलिसांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर महापौर विनीता राणे यांनी मध्यस्थी करत कर्मचाºयांचे शिष्टमंडळ आणि प्रशासनाची चर्चा घडवून आणली. अखेर केडीएमसी प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषणाची सांगता झाली. महापौरांच्या वतीने सभागृहनेते श्रेयस समेळ, शिवसेना गटनेते दशरथ घाडीगांवकर आणि ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी उपोषणकर्त्या डॉ. बहनवाल यांना लेखी निवेदन दिले. उपोषण सोडल्यावर कर्मचाºयांनी फटाके फोडून जल्लोष केला.राणेंच्या कानपिचक्याबुधवारी सायंकाळी कर्मचाºयांनी आक्रमक पवित्रा घेत आयुक्त गोविंद बोडके यांची गाडी अडवून त्यांच्या दिशेने बांगड्या भिरकावल्या होत्या. या घडलेल्या प्रकाराबाबत विश्वनाथ राणे यांनी नाराजी व्यक्त केली.आयुक्तांसोबत झालेला प्रकार चुकीचा असून यापुढे असे कोणाच्याच बाबतीत होता कामा नये अशा शब्दात त्यांनी कर्मचाºयांना कानपिचक्या दिल्या.सध्याचे आयुक्त सकारात्मक असून त्यांच्याकडून मागण्यांबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा होईल, यात शंका नाही असेही राणे म्हणाले.
मोदी दौरा उपोषणकर्त्यांच्या पथ्यावर!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 11:01 PM