शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

मेळघाटातील राख्या मोदींच्या हातावर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 12:45 AM

रक्षाबंधनाच्या दिवशी २६ आॅगस्टला तेथील राख्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातावर बांधल्या जाणार आहेत.

- जान्हवी मोर्येकल्याण : मेळघाटामधील धारणी तालुक्यातील लवादा येथील आदिवासी बांबू केंद्राच्या मदतीने पर्यावरणपूरक राख्या तयार करतात. रक्षाबंधनाच्या दिवशी २६ आॅगस्टला तेथील राख्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातावर बांधल्या जाणार आहेत. मोदी यांनी या केंद्रातील कार्यकर्त्यांना राखी बांधण्यासाठी आमंत्रित केले आहे. त्यामुळे तेथील कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.मेळघाट हा प्रदेश कुपोषित आहे. बांबू तेथे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. स्थानिक आदिवासींनी बांबूपासून निरनिराळ्या वस्तू बनवून आपली हजारो वर्षांपासूनची कला जोपासली आहे. बांबू व वनस्पतीच्या बियांपासून त्यांनी बनवलेल्या पर्यावरणपूरक राख्यांना महाराष्ट्रात आणि देशाबाहेरही चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आदिवासींना रोजगाराची संधी मिळाली आहे. मोदी यांनी या कलेची दखल घेत बांबू केंद्राच्या कार्यकर्त्यांना रविवारी राख्या बांधण्यासाठी आमंत्रित केले आहे, अशी माहिती इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी दिली आहे.बांबू केंद्राचे प्रमुख सुनील देशपांडे म्हणाले की, केंद्राच्या चार आदिवासी महिलाही राखी बांधण्यासाठी नवी दिल्ली येथे जाणार आहेत. केंद्र सरकारच्या इंडियन कौन्सिल फॉर क्लचरल रिलेशन्सच्या वतीने मेळघाटातील आदिवासी कारागिरांनी तयार केलेल्या या राख्या जगभरातील ४० देशांमध्ये जाणार आहेत. याशिवाय, या पर्यावरणपूरक राख्या विद्यार्थ्यांना तयार करता याव्यात, यासाठी ६० हजार राख्या बनवण्याचे संच तयार करण्यात आले आहेत. राज्यातील ५०० शाळांतील विद्यार्थ्यांना ते देण्यात आले आहेत.

टॅग्स :RakhiराखीNarendra Modiनरेंद्र मोदीRaksha Bandhanरक्षाबंधन