शहरं
Join us  
Trending Stories
1
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
2
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
3
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
4
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
5
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
6
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
7
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
8
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
9
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
10
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम
11
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
12
युवीने सांगितला जुना किस्सा! चाहत्यांनी फटकारले; दीपिकाची बदनामी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
13
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
14
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
15
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
16
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
17
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
18
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
19
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
20
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."

मोहाची झाडे ठरताहेत ग्रामीण भागातील जनतेला फलदायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 12:56 AM

फळा-फुलांपासून विविध लाभ

राहुल वाडेकरविक्रमगड : जि ग्रामीण भाग म्हटला की, हिरवागार मखमलींनी नटलेला परिसर. ग्रामीण भागात आंब्याच्या झाडानंतर दुसरा क्रमांक मोहाच्या झाडाचा लागतो. मोठ्या प्रमाणात असलेल्या या मोहाच्या झाडाचा गोरगरीब आदिवासी कुटुंबांना चांगला फायदा होतो. त्याच्या पालापाचोळ्याचा खत म्हणून होणारा उपयोग, त्याच्या फुलांपासून बनवल्या जाणाऱ्या गावठी दारूचा औषध म्हणून वापर, फळांची केली जाणारी भाजी, बियांपासून बनणारे खाद्यतेल असे एक ना अनेक उपयोग असल्याने ही झाडे ग्रामीण भागातील आदिवासींसाठी खऱ्या अर्थाने फलदायी ठरत आहेत. विक्रमगड, जव्हार, मोखाडा अशा आदिवासी दुर्गम भागातील जंगलात मोहाचे फलदायी वृक्ष गोरगरीब आदिवासी कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले आहेत. बहुतांश शेतकरी, शेतमजूर हे शेतीपूरक व्यवसायावर जास्त अवलंबून असतात. शेतकऱ्याला स्वतःचे ऊन, वारा, पाऊस यापासून रक्षण करण्याकरिता मोहाचे झाड तर असतेच, त्यापासून लाकूड तर मिळतेच, पण पावसाळ्यात या झाडाची नवीन फुटलेली पालवी उन्हाच्या उष्णतेने सुकून जाते. या झाडांचा जमिनीवर पडलेला पालापाचोळा शेतीची राबणी करण्याकरिता वापरला जातो. गोरगरीब शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी रासायनिक खते परवडत नाहीत. महागाईच्या भडक्याचा विचार केला तर बाजारात खाद्यतेलाला प्रतिकिलो १३० ते १५० रुपये भावाप्रमाणे शेतकऱ्यांची वार्षिक २० ते ३० हजार रुपये बचत होत असते. तर फुलांपासून रोजगारही प्राप्त होतो.शेतकरी खरीप हंगामाकरिता शेतीची राबणी करण्यासाठी जंगलातील पालापाचोळा गोळा करून शेतात भाजतात. त्यापासून शेतात पेरलेल्या भाताच्या रोपट्याला उपयुक्त खत मिळते.या झाडाला पिवळ्या रंगाची फुले येतात. उष्णता फुलाला लागली की ती फुले खाली पडतात. ही फुले ग्रामीण भागात सकाळ, दुपारपर्यंतच्या वेळेत वेचून उन्हात सुकवतात. कालांतराने या फुलांना भाव मिळाला तर २० ते ३० रुपये किलोने विकली जातात. मोहाच्या झाडाला काही दिवसानंतर फळे येतात. या भागात या फळांना दोडे (मोहट्या) म्हणतात. त्या सुकवून बारमाही केव्हाही भाजीसाठी वापर केला जातो तर पिकलेल्या दोड्यांमधून पाच ते सहा बिया मिळतात. शिवाय यातील फळांच्या टरफलांपासून शेतात खतही तयार होते. फुलानंतर मोहाच्या झाडाला काही दिवसांनंतर फळे येतात. काही वेळेस कोवळ्या दोड्यापासून स्वादिष्ट भाजीचे साधन म्हणून मोहट्या तयार केल्या जातात. त्या सुकवून बारमाही केव्हाही भाजीसाठी वापर केला जातो. तर पिकलेल्या दोड्यामधून पाच ते सहा बिया मिळतात. मजूर दिवसभर २ ते ३ टोपल्या जमा करतो. त्यानंतर त्या बिया फोडल्या असता, यामधून दोन दले मिळतात. त्यास ग्रामीण भागात लोक डाळंब संबोधतात.