शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

जयतीर्थ मेवुंडी यांच्या बंदिशीची प्रेक्षकांवर मोहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 5:35 PM

श्रीकृष्णावरील विविध बंदिशी, अभंग आणि ठुमरी सादर करून सुप्रसिध्द गायक जयतीर्थ मेवुंडी यांनी प्रेक्षकांवर मोहिनी घातली.

डोंबिवली- श्रीकृष्णावरील विविध बंदिशी, अभंग आणि ठुमरी सादर करून सुप्रसिध्द गायक जयतीर्थ मेवुंडी यांनी प्रेक्षकांवर मोहिनी घातली. निमित्त होते ते श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘देवाचिया द्वारी’ या कार्यक्रमाचे.श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या संगीत महोत्सवाचे दुसरे पुष्प सुप्रसिध्द गायक जयतीर्थ मेवुंडी यांच्या गायनाने गुंफण्यात आले. मराठी गीतांची ही मैफील आप्पा दातार चौकात काल सायंकाळी पार पडली. यावेळी संस्थानचे अच्युत कºहाडकर, प्रविण दुधे आदी मान्यवर उपस्थित होते.मेवुंडी यांनी यमन रागाने कार्यक्रमाला सुरूवात केली. मेवुंडी यांनी स्वत:चीच ‘‘हे गोंविद गोपाल’’ ही बंदिश सादर क रून प्रेक्षकांची वाहवाह मिळविली. पंडित भीमसेन जोशीपूर्वी उस्ताद आमीर खा यांनी तराणा हा प्रकार आणला होता. परंतु त्या काळात यु टयुब नसल्याने तो प्रसिध्द होऊ शकला नाही. त्या तराणाचे कोणतेही रेकॉर्डिग नाही. भीमसेन जोशीचा तराणा मेवुंडी यांनी यावेळी सादर केला. त्याला प्रेक्षकांनी वाहवाहची दाद दिली. त्यानंतर त्यांनी केदार रागातील श्रीकृष्णाचे वर्णन करणारी ‘‘कान्हा रे नंद नंदन कान्हा’’ बंदिश सादर करून प्रेक्षकांना जिंकून घेतले. ‘‘कोण गुनने से मनाओ, पिया तो मानत नाही’’ ही ठुमरी त्यांनी सादर क रताच प्रेक्षकांनी टाळ््याच्या कडकडाटात दाद दिली. अब्दुल करीम खा यांनी कर्नाटकी स्टाईल प्रसिध्द केली. म्हैसूर खा, आमीर खा, भीमसेन जोशी, फिरोज दस्तुर,माणिक वर्मा या प्रत्येकांची एक वेगळी शैली गायनाची होती. या प्रत्येकांनी गायिलेली ‘‘जय जय रामकृष्ण हरी’’ ही ठुमरी मेवुंडी यांनी सादर केली. या ठुमरीने प्रेक्षकांची वन्स मोअरची दाद मिळविली. त्यानंतर त्यांनी ‘‘लागली समाधी, समाधी ज्ञानेशाची, इंद्रायणी काठी, देवाची आळंदी’’ हा अभंग सादर केला.मेवुंडी यांना व्यंक टेश कुलकर्णी, आदिती कºहाडे यांनी साथ संगत केली.फोटो आनंद मोरे----------------------------------------------------------------