शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

आधारकार्डसाठी रखडलेल्याना आता मानधन; राज्यातील ४३३६ अंगणवाडी सेविकांना धिलासा

By सुरेश लोखंडे | Published: November 05, 2018 6:51 PM

राज्यातील अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे या विभागांमध्ये एक लाख ९७ हजार ९६ अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. यापैकी एक लाख ९२ हजार ७६० सेविकांचे मानधन आता ‘पीएफएमबी’ या संगणकीय प्रणालीव्दारे त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे. मात्र उर्वरित चार हजार ३३६ अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांनी त्यांचा आधारकार्ड क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी सलग्न केला नाही.

ठळक मुद्देएक लाख ९२ हजार ७६० सेविकांचे मानधन आता ‘पीएफएमबी’ या संगणकीय प्रणालीव्दारे त्यांच्या बँक खात्यातउर्वरित चार हजार ३३६ अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांनी त्यांचा आधारकार्ड क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी सलग्न केला नाही. या सेविकांचे मानधन जुन्या पध्दतीने काढण्याचे आदेश १ नोव्हेबर जारी

ठाणे : अंगणवाडी सेविकांनी त्यांचे आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न न केल्याममुळे राज्यभरातील सुमारे चार हजार ३३६ अंगणवाडी सेविकांचे आॅगस्टपासूनचे मानधन रखडले होते. पण दिवाळीच्या मुहूर्तावर हा विषय गांभीर्याने घेत राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने या सेविकांचे मानधन जुन्या पध्दतीने काढण्याचे आदेश १ नोव्हेबर जारी केले. यामुळे राज्यभरातील सेविकांना धिलासा मिळाला असून त्यांची दिवाळी गोड झाली.राज्यातील अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे या विभागांमध्ये एक लाख ९७ हजार ९६ अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. यापैकी एक लाख ९२ हजार ७६० सेविकांचे मानधन आता ‘पीएफएमबी’ या संगणकीय प्रणालीव्दारे त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे. मात्र उर्वरित चार हजार ३३६ अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांनी त्यांचा आधारकार्ड क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी सलग्न केला नाही. यामुळे त्यांचे आॅगस्टपासूनचे मानधन रखडले आहे. ऐन दिवाळीत या सेविकाना मानधनापासून वंचित ठेवणे योग्य नसल्याची जाणीव होताच शासनाने या सेविकांचे मानधन जुन्या पध्दतीने जारी करण्याचे आदेश जारी केले.या शासन निर्णयामुळे बँक खाती आधारकार्डशी संलग्न झालेले नाही, अशा अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांचे रखडलेले आॅगस्ट ते डिसेंबर या कालावधीमधील मानधन जुन्या पद्धतीने देण्यासाठी शासनाने मान्यता देऊन तसा शासन निर्णयही जारी केला आहे. यानंतरचे मानधन मात्र ‘पीएफएमबी’ या संगणकीय प्रणालीव्दारे बँक खात्यात जमा होईल. त्यासाठी संबंधीत अधिकाऱ्यांना देखील जबाबदारीने संबंधीत सेविकांकडून आधारकार्ड बँक खात्याशी सलग्न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.‘पीएफएमबी’ प्रणालीत खाते जोडणी करण्यासाठी अंगणवाडी सेविका सहकार्य करीत नसतील तर संबंधित अधिकाºयांबरोबर अंगणवाडी सेविकांवर देखील जबाबदारी निश्चित करून त्यांच्याविरु द्ध कारवाई करण्यात येईल असे सुद्धा आदेश देण्यात आले आहे. यामुळे सेविकांनी तातडीने बँक खात्याशी आधारकार्ड सलग्न करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे राजेश सिंह यांनी केले आहे.

टॅग्स :thaneठाणेTeacherशिक्षक